भारत वि ऑस्ट्रेलिया(फोटो-सोशल मीडिया)
Australia set India a target of 237 runs : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मॅथ्यू रेनशॉच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावाच करू शकला. भारताला विजयासाठी २३७ धावा कराव्या लागणार आहे. सिडनीमध्ये भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला २५० धावांच्या आत मध्येच रोखले. भारताकडून हर्षित राणाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
सामन्याआधी कर्णधार मिचेल मार्शने सलग तिसऱ्या सामन्यात देखील टॉस जिंकला. तर भारताच्या पदरी टॉसबाबत सलग तिसऱ्या सामन्यात निराशा आली. मिचेल मार्शने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड २९ धावा काढून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीसाठी मॅथ्यू रेनशॉ मैदानात आला. मिचेल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी २७ धावा जोडल्या, त्यांतर मिचेल मार्शला अक्षर पटेलने माघारी पाठवले. त्याने ५० चेंडूत ४१ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ठराविक अंतराने विकेट जात राहिल्या. दरम्यान मॅथ्यू रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५८ चेंडूत ५६ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्याने २ चौकार मारले. वॉशिंग्टन सुंदरने त्याची शिकार केली.
त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानात टिकाव धरता आला नाही. मॅथ्यू शॉर्टने ४१ चेंडूंत दोन चौकारांसह ३० धावा केल्या. अॅलेक्स कॅरी २४ धावा, कूपर कॉनोली २३ धावा, मिच ओवेन १ धाव, मिशेल स्टार्क २ धावा, नॅथन एलिस १६ धावा आणि जोश हेडलवुड ० धावा काढून बाद झाला. तर अॅडम झांपा २ धावांवर नाबाद राहिला. भारताकडूनकडून हर्षित राणाने ८.४ षटकांत ३९ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने दोन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग ११ : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, मिच ओवेन, नॅथन एलिस, मिशेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेडलवुड
हेही वाचा : Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर
भारताचा प्लेइंग ११ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज






