Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Womens T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; सोफी मोलिनक्सकडे कर्णधारपदाची धूरा, पाहा कोणाला मिळाली संधी

Women's T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाने 2026 महिला टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सोफी मोलिनक्सकडे नेतृत्व असून डार्सी ब्राउनला डच्चू देण्यात आला आहे. पहा पूर्ण वेळापत्रक आणि संघ.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 13, 2026 | 11:39 AM
टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा (Photo Credit- X)

टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
  • सोफी मोलिनक्सकडे कर्णधारपदाची धूरा
  • पाहा कोणाला मिळाली संधी
ICC Women’s T20 World Cup 2026: इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या आगामी महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपल्या १५ सदस्यीय बलाढ्य संघाची घोषणा केली आहे. १२ जूनपासून सुरू होणाऱ्या या महाकुंभासाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू सोफी मोलिनक्स (Sophie Molineux) कडे सोपवण्यात आले आहे. या निवडीत काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले असून युवा रक्ताला अधिक संधी देण्यात आली आहे.

अनुभवी डार्सी ब्राउन संघाबाहेर; 20 वर्षीय लूसी हॅमिल्टनला संधी

या संघ निवडीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउनला वगळण्यात आले आहे. ब्राउनने 41 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 34 विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या जागी 20 वर्षीय लूसी हॅमिल्टनचा संघात समावेश करण्यात आला आहे. हॅमिल्टनकडे जरी आंतरराष्ट्रीय टी-20 चा अनुभव कमी असला, तरी तिने 19 वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे.

अनुभव आणि तरुणाईचा संगम

ऑस्ट्रेलियन संघात एलिस पेरी, बेथ मूनी, ॲश गार्डनर आणि मेगन शट यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, ज्या कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता ठेवतात. तसेच, जॉर्जिया वोल ही 22 वर्षीय खेळाडू आपला पहिला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज आहे. सोफी मोलिनक्सच्या नेतृत्वाखालील या संघात अनुभवी अष्टपैलू खेळाडूंची मोठी फळी आहे.

Our Aussie women ready to take on the
world in England and Wales next month! 💪#T20WorldCup @AusWomenCricket pic.twitter.com/pBpNQCmagY
— Cricket Australia (@CricketAus) May 12, 2026

एलिस पेरी रचणार इतिहास

ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी या विश्वचषकात 50 सामने पूर्ण करण्याच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 2009 पासून प्रत्येक टी-20 विश्वचषकात खेळणारी पेरी असा पराक्रम करणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरू शकते.

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

विश्वचषकासाठी निवडलेला ऑस्ट्रेलियन संघ:

सोफी मोलिनक्स (कर्णधार), निकोला केरी, ॲश गार्डनर, किम गार्थ, लूसी हॅमिल्टन, ग्रेसी हॅरिस, अलाना किंग, फोबे लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वोल आणि जॉर्जिया वारेहम.

ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: ताहलिया विल्सन (यष्टीरक्षक).

विश्वचषक 2026: ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियन संघ आपली मोहीम १३ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू करेल. विशेष म्हणजे, २८ जून रोजी ‘लॉर्ड्स’च्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.

  • 13 जून: विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुपारी 2:30 वा.)
  • 17 जून: विरुद्ध बांगलादेश (सकाळी 10:30 वा.)
  • 20 जून: विरुद्ध नेदरलँड्स (सकाळी 10:30 वा.)
  • 23 जून: विरुद्ध पाकिस्तान (संध्याकाळी 6:30 वा.)
  • 28 जून: विरुद्ध भारत (दुपारी 2:30 वा.)

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

Web Title: Australia squad announced for t20 world cup sophie molineux takes over captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Australia
  • cricket news
  • ICC
  • Sports News
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन
1

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?
2

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?

Carrom Sports News: कॅरम स्पर्धेत पुणेकरांचा डंका! अभिजीत त्रिपणकर अन् आयुष गरुडची दुसऱ्या फेरीत धडक
3

Carrom Sports News: कॅरम स्पर्धेत पुणेकरांचा डंका! अभिजीत त्रिपणकर अन् आयुष गरुडची दुसऱ्या फेरीत धडक

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद
4

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.