लखनऊ – आयसीसी वनडे वर्ल्ड कप (Cricket World Cup 2023) स्पर्धेचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. सध्या भारतात सर्वंत्र क्रिकेटमय वातावरण झालं आहे. काल भारताने अफगानिस्तानवर दणदणीत आठ विकेटनी मात केली. यानंतर भारताचा पुढील सामना पाकिस्तानसोबत शनिवारी होणार आहे. तर आज विश्वचषकातील 10 वा सामना हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. हा सामना डे-नाईट असून, सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं आहे. तर दुसरीकडे बलाढ्य कांगारुना भारताने हरवले आहे. त्यामुळं कांगारुसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. (australia vs south africa today how to watch matches for free what changes in both teams)
Australia looks to bounce back against an in-form South Africa ?
Who’s taking home the points in Lucknow?#AUSvSA | #CWC23 pic.twitter.com/W6Lps1QQF8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 12, 2023
कांगारु पहिला विजय मिळवणार?
दरम्यान, आज विश्वचषकातील 10 वा सामना खेळविण्यात येणार आहे. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात कॉंटे की टक्कर अशी लढत पाहयला मिळणार आहे. कांगारुंना अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 7 ऑक्टोबर रोजी 102 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळं कांगारुंना आजचा सामना खूप महत्त्वाची आहे. कांगारु आज पहिला विजय मिळवणार का, याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.
फुकट सामना कसा पाहता येणार?
विश्वचषकातील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर फुकटात पाहता येईल. मात्र त्यासाठी क्रिकेट चाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टार हा एप डाऊनलोड करावा लागेल. या एपवर विविध भाषेमध्ये क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम
पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
दक्षिण आफ्रिका टीम
टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .