ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय (फोटो- ani)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिका सुरू
महिला विश्वचषक सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांसाठी हा सराव मालिकेचे आयोजन
सध्या मालिका 1-1 बरोबरीत
India Vs Austrelia Women’s Series: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये खेळवली जात आहे. आज या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताचा 43 धावांनी पराभव झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताच्या संघावर 43 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली आहे. आजचा तिसरा सामना दिल्लीत खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करण्यात आली. त्यानंतर एलिसा हिली 30 धावा करून बाद झाली.
A spirited and solid show with the bat from #TeamIndia 👍 👍
But it was Australia who won the third ODI by 43 runs to win the series!
Scorecard ▶️ https://t.co/epqQHJ5BA5#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zVnF6WzysR
— BCCI Women (@BCCIWomen) September 20, 2025
नंतरच्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 47.5 ओव्हर्समध्ये 412 धावांचा डोंगर भारतापुढे उभा केला. भारताकडून अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा, रेणुका सिंह यांनी 2 व क्रांती गौडने 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने भारताला 413 धावांचे लक्ष्य दिले आहे.
413 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रतिका रावल 10 धावा करून बाद झाली. हरलीन देओल 11 धावा करून बाद झाली. स्मृती मंधानाने बाजू सावरून धरली होती. 23 चेंडूत तिने आपले अर्धशतक पूर्ण केले.
स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत यांच्यात 121 धावांची भागीदारी झाली. हरमनप्रीत 52 धावा करून बाद झाली. 50 चेंडूत स्मृती मंधानाने आपले शतक पूर्ण केले. स्मृती मंधाना 125 धावा करून बाद झाली. दीप्ती 72 धावा करून बाद झाली. भारताने सर्व विकेट गमावून 369 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारतावर 43 धावांनी पराभव केला.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली. भारतीय महिला संघाच्या खेळाडू गुलाबी जर्सीमध्ये दिसत होते. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर सदस्यांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी या गंभीर समस्येबद्दल सर्वांना संदेशही दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते या गंभीर आजाराविरुद्ध एकत्र लढतील. चाहते कमेंट सेक्शनमध्ये बीसीसीआय आणि भारतीय महिला संघाचे कौतुक करताना दिसून आले.