फोटो सौजन्य - mdshami.11
क्रिकेटर्सचा व्हिडीओ व्हायरल : मोहम्मद शामी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघामधून बाहेर झाला होता. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून लांब राहिला आहे. आता लवकरच मोहम्मद शामी संघामध्ये पुनरागमन करणार असे चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी भारत विरुद्ध बांग्लादेश या मालिकेमध्ये शामीचे पुनरागमन होणार असे म्हंटले जात आहे. त्याच्या दुखापतीच्या अपडेट तो सोशल मीडियावर देत असतो. त्याचबरोबर शामी सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळतो. आता नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोहम्मद शामीने शेअर केला आहे यामध्ये आवेश खान, सरफराज खान, शार्दूल ठाकूर हे सुद्धा या व्हिडिओचा भाग आहेत. हा गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मोहम्मद शामीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शामीसोबत असे काही घडले की तो जिममध्ये बेशुद्ध पडला. आवेश खान, सरफराज खान, शार्दुल ठाकूर आणि तिलक वर्मा हे जिममध्ये त्याच्यासोबत होते. या सर्वांनी मिळून शमीला खूप त्रास दिला आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली. शामीने वळून त्याची विचारपूस केली असता शमी बेशुद्ध झाला. शमीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये टिळक वर्मा सर्वात आधी येतो आणि शमीला प्रश्न विचारतो “चीन टपक दम दम”. यानंतर सरफराज त्याच्याकडे येतो आणि तोही “चीन टपक दम दम” असा प्रश्न विचारतो. आणखी दोन लोक शमीकडे येतात आणि पुन्हा तोच प्रश्न विचारतात. यानंतर आवेश खानही येतो आणि तोच प्रश्न विचारतो. मग शार्दुल ठाकूर, सरफराज आणि टिळक सोबत येतो आणि प्रश्न पुन्हा करतो. यानंतर शमी रागाने विचारतो, ‘हे काय आहे?’
यानंतर शामी जमिनीवर बेशुद्ध पडून राहतो आणि त्याच्यावर पाणी टाकून त्याला उठवले जाते. तेव्हा तो त्याच्या चाहत्यांना सांगतो की, हा प्रश्न मी विचारला आहे, पण तुम्ही तो विचारू नका.
सध्या सोशल मीडियावर एक डायलॉग व्हायरल होत आहे. हा डायलॉग ‘चीन टपक दम-दम’ आहे, सगळे शमीकडे येतात आणि हे म्हणतात आणि शमीला समजत नाही. हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.