फोटो सौजन्य - Bangladesh Cricket सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. १९ फेब्रुवारीला पहिला चॅम्पियन ट्रॉफीचा सामना होणार आहे. आता सर्व संघ पाकिस्तानला रवाना होणार आहेत, भारत आणि बांग्लादेश संघ पहिला सामना युएईमध्ये खेळणार आहे. भारताचा संघ सर्व सामने युएईमध्ये खेळणार आहे. टीम इंडिया सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानला जाणार नाही त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने युएईला खेळवले जाणार आहेत. यापूर्वी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी स्टार अष्टपैलू मेहदी हसन मिराजला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. बांगलादेशचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होईल.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा दावेदार मानले जात आहे. यानंतर, बांगलादेशला २४ आणि २७ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे आणि पाकिस्तानचे यजमानपद भूषवायचे आहे. हे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत.
२७ वर्षीय मेहदी ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीत फलंदाजी करतो. त्याने बांगलादेशसाठी १०३ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि अलीकडेच नियमित कर्णधार नझमुल हुसेन शांतो दुखापतग्रस्त झाल्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये संघाचे नेतृत्व केले. खुलनामध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूने आतापर्यंत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत २५.३८ च्या सरासरीने १५९९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ११० विकेट्सही घेतल्या आहेत. दरम्यान, बीसीबीने घोषणा केली की वेगवान गोलंदाज खालेद अहमद आणि हसन महमूद संघासोबत सरावासाठी दुबईला जातील.
बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी संघासोबत सराव करण्यासाठी वेगवान गोलंदाज हसन महमूद आणि खालेद अहमद शनिवारी दुबईला रवाना होतील, असे बीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे. २० फेब्रुवारी रोजी दुबई येथे भारताविरुद्ध बांगलादेशच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यानंतर हा गोलंदाज मायदेशी परतेल.
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २० फेब्रुवारी रोजी युएईमध्ये पहिला सामना चॅम्पियन ट्रॉफीचा खेळवला जाणार आहे. नझमुल हुसेन शांतो आणि रोहित शर्मा हे दोन्ही कर्णधारांचे संघ आमनेसामने असणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्या गटामध्ये आहेत. भारत आणि बांग्लादेशसह न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाचा ग्रुप A मध्ये समावेश आहे.
नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकेर अली अनिक, मेहेदी हसन मिराज (उपकर्णधार), रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्जीम हसन साकिब, नाहिद राणा.