भारत विरुष झिम्बाब्वे (फोटो- सोशल मिडिया)
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील आगामी टी-२० आणि वनडे सिरिजचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या दौऱ्याची सुरूवात 16 ऑक्टोबरपासून टी 20 सिरिजने होणार आहे. या सिरिजमध्ये तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. टी 20 सिरिज रायपुरमध्ये खेळवली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
पहिला टी-२० सामना: १६ ऑक्टोबर
दुसरा टी-२० सामना: १८ ऑक्टोबर
तिसरा टी-२० सामना: २० ऑक्टोबर
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १५ सदस्यांच्या भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. स्टार सलामीवीर स्मृती मंधाना हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून, अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संपूर्ण भारतीय संघ
स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, हरलीन देयोल, तेजल हसब्निस, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), वैष्णवी शर्मा, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, सयाली सतघरे आणि रेणुका ठाकूर.






