भारताचा संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार? (फोटो- सोशल मीडिया)
भारत बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार का हे पूर्णपणे भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटल्याचे समोर येत आहे. क्रिकेट बोर्डाचे काम केवळ क्रिकेटचे सामने खेळवणे आणि त्याचे नियोजन करणे आहे. आमचे काम दुसऱ्या देशाच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे नाही.
2025 मध्ये बांग्लादेशमध्ये मोठा संघर्ष झाला होता. तिथे सत्ताबदल झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बीसीसीआयने बांग्लादेश क्रिकेट बोर्डशी चर्चा करून हा दौरा रद्द केला होता. आता देखील केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही.
IND vs AFG: तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात धडाकेबाज बॉलरची Surprise Entry, BCCI ने केली घोषणा
टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेल्या बांग्लादेशचा संघ
मागील वर्षी भारत आणि बांग्लादेशमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 मध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. तसेच बांग्लादेशच्या संघाने पाकिस्तानच्या प्रभावाखाली येऊन भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे बांग्लादेश संघाला वर्ल्ड कप बाहेर करण्यात आले होते.
IND Vs AFG Live: भारताची अफगाणिस्तानविरूद्ध ‘शुभ’मन सुरूवात, राहुलची खंबीर साथ; विजयी घोडदौड
भारताच्या संघात धडाकेबाज बॉलरची Surprise Entry
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. यापूर्वी, BCCI ने हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश केला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी एका सराव सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. बीसीसीआयने माहिती दिली की, सेंटर ऑफ एक्सलन्सकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हर्षितचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या आगमनाने भारतीय वेगवान गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल. त्याला थेट अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधीही मिळू शकते. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघात सातत्याने बदल केले जात आहेत.






