BCCI Gives 8.5 Crore to IOA : ऑलिम्पिक 2024 या आठवड्यापासून पॅरिसमध्ये सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडूंचा संघ विक्रम मोडून पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील आपल्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असल्याचे सांगितले आहे. यामुळेच बीसीसीआयने ऑलिम्पिक मोहिमेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) 8.5 कोटी रुपये दिले आहेत. खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली पोस्ट
जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, BCCI पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या सर्वोत्तम खेळाडूंना पाठिंबा देईल. आम्ही या मोहिमेसाठी (ऑलिम्पिक) IOA ला 8.5 कोटी रुपये देत आहोत.
भारतीय क्रिकेट संघाने या वर्षी जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघ आणि सपोर्टिंग स्टाफला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते. 15 खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले. द्रविडने केवळ अडीच कोटी रुपये घेण्याचे सांगितले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडूंचा सहभाग
आम्ही तुम्हाला सांगतो की, यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय क्रीडा मंत्रालयाने सपोर्ट स्टाफच्या 140 सदस्यांनाही मान्यता दिली आहे, ज्यात क्रीडा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सहाय्यक कर्मचाऱ्यांचे ७२ सदस्य शासकीय खर्चाने मंजूर करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होईल आणि 11 ऑगस्टपर्यंत चालेल.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील 119 खेळाडूंनी भाग घेतला, ज्यांनी 7 पदके जिंकली. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये केवळ शॉटपुट ऍथलीट आभा खटुआचे नाव यादीत नाही.
ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्सचे 29 खेळाडू असणार
खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक 29 (11 महिला आणि 18 पुरुष) खेळाडू ॲथलेटिक्समधील आहेत. त्यांच्यानंतर नेमबाजी (21) आणि हॉकी (19) येते. भारताचे ८ खेळाडू टेबल टेनिसमध्ये सहभागी होतील, तर दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूसह ७ खेळाडू बॅडमिंटनमध्ये सहभागी होतील.
कुस्ती (6), तिरंदाजी (6) आणि बॉक्सिंग (6) मध्ये प्रत्येकी 6 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये आपले आव्हान सादर करतील. यानंतर गोल्फ (4), टेनिस (3), पोहणे (2), सेलिंग (2) येतो. घोडेस्वारी, ज्युदो, रोइंग आणि वेट लिफ्टिंगमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होईल.