नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नायजेरियातील मशिदीत आत्मघातकी हल्ला ; स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम भागातील केब्बी राज्यात अतिरेकी हल्ल्याची (Terror Attack) घटना घडली आहे. बुधवारी (१८ फेब्रुवारी) अरेवा स्थानिक सरकारी क्षेत्रात बुई जिल्ह्यात बंदूकधारकांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लकुरावा नावाच्या उग्रवादी गटाने हल्ला केला असल्याचे सनोर आले आहे.
नायरेजियातील आणखी एक दु:खद घटना म्हणजे खाणीतील गॅस गळती, ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या प्लेट्यू राज्यात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) ही घटना घडली आहे. जुराक समुदायाच्या क्षेत्रातील शिसे खाणीत विषारी वायूची गळती आणि स्फोटामुळे ३८ कामगरांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जखमी झाले आहेत. या घटनेने मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या खाणीत ही दुर्घटना घडली आहे. सध्या या गॅस गळतीमुळे लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या दोन्ही घटनांमुळे नायजेरियात भितीचे वातावरण पसरले आहे. खाणकामाच्या वेळी गॅस गळती आणि स्फोटांच्या घटना आता सामान्य बनल्या आहे. परंतु यामुळे पुन्हा एकदा खाणकामगारंच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. यापूर्वी देखील गॅस गळतीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
तसेच दुसरीकडे हिंसाचाराच्या घटनामध्ये देखील तीव्र वाढत होत आहे. येलवाटा बंदूकधारकांडून सतत हल्ले होत आहे. कोणत्याही भीतीशिवाय लोकांची हत्या केली जात आहे. या बंदूकधारी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे विस्थापन होत आहे. या परिसरात अन्न सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. जमिनीचे वाद, धार्मिक आणि वाशिंक तणावांमुळे बेन्यूत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.
A toxic gas leak at a mine in north-central Nigeria killed 37 people and led to the hospitalization of 26 others, according to police. https://t.co/0dYVCBNqia — africanews (@africanews) February 19, 2026
Ans: नायजेरियाच्या प्लेट्यू राज्यात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) शिसे खाणीत गॅस गळती आणि स्फोट झाला आहे.
Ans: जुराक समुदायाच्या क्षेत्रातील शिसे खाणीत विषारी वायूची गळती आणि स्फोटामुळे ३८ कामगरांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जखमी झाले आहेत.
Ans: नायजेरियात केब्बी राज्यात बुधवारी (१८ फेब्रुवारी) अरेवा स्थानिक सरकारी क्षेत्रात बुई जिल्ह्यात बंदूकधारकांनी भीषण हल्ला केला.
Ans: नायजेरियात केब्बी राज्यातील बंदूकधारकांच्या हल्ल्यात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.






