फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad सोशल मीडिया
Indian Premier League 2025 : आता लवकरच भारताचा क्रिकेटचा उत्सव सुरु होणार आहे. यामध्ये स्टार खेळाडू खेळताना दसिणार आहेत. या आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचे कर्णधार बदलले आहेत, त्याचबरोबर अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली लावून फ्रॅन्चायझींनी विकत घेतले आहे. पण सनरायझर्स हैदराबादचा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालीच या सीझनमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. २०२४ च्या आयपीएलमध्ये हैदराबादच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती, यावेळी संघ कधी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.
भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट आली आहे. साईड स्ट्रेनच्या समस्येतून बरे झाल्यानंतर, नितीश त्याच्या आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील होण्यास सज्ज झाला आहे. दुखापतीमुळे नितीश जानेवारीपासून एकही सामना खेळू शकलेला नाही. नितीशने बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ येथे यो-यो चाचणीसह सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत. फिजिओने त्याला खेळण्याची परवानगीही दिली आहे.
आंध्र प्रदेशच्या २१ वर्षीय खेळाडूने भारतासाठी शेवटचा सामना २२ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळला. तो त्याचा पहिलाच टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता. तथापि, त्या सामन्यात त्याने फलंदाजी किंवा गोलंदाजी केली नाही. चेन्नईतील दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी नितीशने नेटमध्ये सराव केला. पण बाजूच्या दुखापतीमुळे तो त्या सामन्यातून आणि उर्वरित पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला.
गेल्या वर्षी खेळाडूंच्या लिलावापूर्वी नितीशला हैदराबाद संघाने ६ कोटी रुपयांना कायम ठेवले होते. त्याने आयपीएलच्या गेल्या हंगामात १३ सामन्यांमध्ये १४३ च्या स्ट्राईक रेटने ३०३ धावा केल्या होत्या. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने प्रभावित केले आणि मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत ११४ धावांची धाडसी खेळी केली. नितीश लवकरच सनरायझर्स संघात सामील होईल जो २३ मार्च रोजी हैदराबादमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, सचिन बेबी, अंकित वर्मा, अभिषेक शर्मा, अभिनव मनोहर, कामिंडू मेंडिस, विआन मुल्डर, नितीश कुमार रेड्डी, अथर्व तायडे, बायडन कार्स, पॅट कमिन्स, राहुल चहर, ईशान मलिंगा, मोहम्मद शामी, हर्षल पटेल, समरजीत सिंग, जयदेव उनाडकट, झिशान अन्सारी, ॲडम झॅम्पा