कार्लोस अल्काराज(फोटो-सोशलमिडिया)
Carlos Alcaraz Cincinnati Open Winner: कार्लोस अल्काराजने सिनसिनाटी ओपन जिंकून मध्ये रचला आहे. या विजयामुळे कार्लोस अल्काराजचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाला आहे. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या जानिक सिनरविरुद्ध कार्लोसने शानदार खेळ दाखवला आणि विजेतेपद जिंकले. कार्लोस अल्काराजने पाहिल्यांदाच सिनसिनाटी ओपनचे जेडेपद जिंकले आहे.
जानिक सिनर सध्या अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याच वेळी, कार्लोस अल्काराज दुसऱ्या स्थानी आहे. अशा परिस्थितीत, जगभरातील टेनिस प्रेमींच्या नजरा या दोघांमधील सामन्यावर लागलेल्या होत्या. प्रेक्षकांनया एका चांगल्या सामन्याची पर्वणी अनुभवता आली नाही परंतु चाहत्यांना थोडी निराशा झाली. कारण जानिक सिनरची तब्येत बिघडली होती.
हेही वाचा : Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
अल्काराज आणि सिनर यांच्यातील सामना नियोजित वेळेवर झुरू झाला होता. सुरुवातीपासूनच सिनर उष्णतेमुळे त्रस्त असल्याचे दिसू लागले होते. पहिल्या सेटमध्ये ०-५ ने पिछाडीवर राहिल्यानंतर, त्याने डॉक्टरांना बोलावून घेतले आणि उष्णतेचा सामना करण्यासाठी बर्फाची देखील मदत घेतली, परंतु सामना पुढे चालू ठेवू शकला नाही. २३ मिनिटांनंतर त्याने निवृत्ती घतेली. यानंतर, अल्काराजला अंतिम विजेता घोषित करण्यात आले. अल्काराजचे हे पहिले सिनसिनाटी ओपन जेतेपद आणि वर्षातील सहावे जेतेपद ठरले.
सर्व्हिसमध्ये एकही पॉइंट जिंकता न आल्याने सिननरची अडचण समोर आली.सर्विस ही सिनरची जमेची बाजू म्हटले जाते. सलग पाचवा गेम गमावल्यानंतर, सिननरने डॉक्टरांना मैदानात पाचारण केले आणि त्यानंतर त्याने लवकरच कार्लोस अल्काराजशी हस्तांदोलन केले आणि सामना संपल्याची घोषणा केली. जर सिननरने अंतिम सामना जिंकला असता, तर तो रॉजर फेडरर (२०१४-१५) नंतर सलग जेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला असता.
हेही वाचा : आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
सामन्यानंतर, सिन्नरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “तुम्हाला निराश केल्याबद्दल मी माफी मागत आहे. कालपासून मला बरं वाटत नव्हतं. मला वाटलं होतं की मी रात्रीपर्यंत ठीक होईल. पण, तसं काही झालं नाही. मी लढण्याचा प्रयत्न केला. पण, मला खेळण्यास जमले नाही. म्हणूनच मी माफी मागतो.” “मला माहित आहे की तुम्ही या परिस्थितीतून नेहमीपेक्षाही चांगल्या प्रकारे परत याल. खरे चॅम्पियन हेच करतात,” कार्लोस अल्काराझने विजेता घोषित केल्यानंतर जॅनिक सिन्नरला सांगितले.