लखनौ विरुद्ध चेन्नई : आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यांमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. आजचा हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. आतापर्यत आयपीएल २०२४ च्या हा हंगामामध्ये दोन्ही संघानी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना नक्कीच रोमांचक होईल. आज चाहत्यांच्या नजरा हा काही खेळाडूंवर असणार आहेत आणि हे खेळाडू आज चमकदार कामगिरी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पथीराना
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सध्या चेन्नई सुपर किंग्ससाठी दमदार कामगिरी करत आहे. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात पथीरानाने 4 बळी घेतले होते, ज्यामुळे चेन्नईला विजय मिळवता आला. अशा स्थितीत आज लखनौविरुद्धही पथीराना आपल्या वेगवान चेंडूंनी चमत्कार घडवू शकतो.
एमएस धोनी
या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल आणि चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक एमएस धोनी आहे. या मोसमात जेव्हा-जेव्हा धोनी फलंदाजीसाठी उतरला आहे, तेव्हा चाहत्यांचे मनोरंजन झाले आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये महेंद्रसिंग दोन्हीचे चाहते देशभरामध्येच नाही तर जगभरामध्ये आहेत. मुंबई विरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात धोनीने षटकारांची हॅट्ट्रिक मारून शो चाहत्यांची मनं जिंकली. अशा परिस्थितीत धोनी लखनौविरुद्ध आजही चमत्कार करू शकतो.
निकोलस पूरन
लखनौ सुपर जायंट्सचा लेफ्टी बॅट्समन निकोलस पुरन याच्याकडे क्षणात सामना बदलण्याची क्षमता आहे. पुरणने या मोसमात आतापर्यंत लखनौसाठी काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. अशा परिस्थितीत आज पूरण लखनौच्या त्याच्या होम ग्राउंडवरही चमत्कार करू शकतो.
शिवम दुबे
चेन्नईचा स्टार अष्टपैलू शिवम दुबेची बॅट आतापर्यंत जोरदार बोलली आहे. दुबेने मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ६६* धावांची शानदार खेळी केली होती. अशा परिस्थितीत आजही लखनौच्या एकना स्टेडियमवर शिवम चेन्नईसाठी चौकार आणि षटकारांसह उपयुक्त ठरू शकतो.