युजवेंद्र चहल(फोटो-सोशल मिडिया)
CSK vs PBKS : आयपीएल २०२५ च्या काल झालेला ४९ वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा दणदणीत पराभव केला. या परभवासोबतच चेन्नईच्या संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सॅम करनच्या ८८ धावांच्या जोरावर किंग्जसमोर १९० धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पंजाबने प्रभसीमरन आणि अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य सहज पूर्ण केलं. या सामन्यात चहलने हॅटट्रिक घेतली.
सामन्याच्या १८ व्या षटकापर्यंत असे वाटत होते की चेन्नई सुपर किंग्ज सहज २०० पेक्षा अधिक धावा करेल, पण तसे झाले नाही. यामागील कारण होते फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल. पंजाबच्या युजवेंद्र चहलने सीएसकेविरुद्ध १९व्या षटकात चार विकेट्स घेतल्या. तसेच यामध्ये त्याने आयपीएल २०२५ ची पहिली हॅटट्रिक देखील घेण्याची करामत दाखवली. हॅटट्रिक घेतल्याने चहलचे चाहते खूप खुश झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांची खूपच मजा-मस्ती बघायला मिळत आहे. काहींनी तर म्हटले की, चहलला सीएसकेमध्ये त्याची माजी पत्नी धनश्री दिसली का? अशा प्रकारे सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.
Yuzi Chahal 🔥🔥🔥#CSKvsPBKS pic.twitter.com/RdHzK1l0r1
— Ayush Dwivedi (@AyushDw18636185) April 30, 2025
पंजाब किंग्जकडून युजवेंद्र चहल १९ वे षटक टाकण्यासाठी आला. महेंद्रसिंग धोनीने चहलने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर चहलने पुनरागमन करत धोनीचा बळी घेतला. यानंतर, या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुडा देखील माघारी पाठवले. नंतर, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर, त्याने अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांचे बळी टिपले. अशाप्रकारे युजवेंद्र चहलने आयपीएल २०२५ ची पहिली हॅटट्रिक घेतली आहे. चहलच्या या हॅटट्रिकनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर खूप मजा करताना दिसत आहेत.
Chahal 😡😤 #CSKvsPBKS #PBKSvCSK #ipl #Dhoni #CSK pic.twitter.com/h4Dgk0xGdb
— 𝓓𝓸𝓵𝓵𝔂 🤍 (@dollybiblio) April 30, 2025
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने तीन षटके टाकली. यादरम्यान त्याने ३२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईच्या डावाच्या १९व्या षटकात त्याने घातक गोलंदाजी केली आणि चार विकेट्स चटकावल्या. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ २०० धावसंख्येपर्यंत देखील पोहोचू शकला नाही.