किपस्टा रेसिस्ट फूटबॉल(फोटो-सोशल फोटो)
Decathlon launches ‘Kipsta Racist Football Series : डिकॅथलॉन या स्पोर्टस् रिटेलरने आज किपस्टा रेसिस्ट फूटबॉल सिरीजच्या लाँचची घोषणा केली, जी भारतातील विविध खेळाच्या मैदानांवरील फूटबॉलपटूंच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. खडतर, सुकी मैदाने ते ओल्या, असमान खेळपट्ट्यांपर्यंत विविध स्थितींना ओळखत डिकॅथलॉनने देशभरातील खेळाडूंना टिकाऊ व विश्वसनीय पर्याय देण्यासाठी आपले सब-लेबल किपस्टा अंतर्गत रेसिस्ट सिरीज डिझाइन केली आहे.
किपस्टा रेसिस्ट फूटबॉल सिरीज भारतातील विविध क्रीडा स्थितींच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी विविध मैदानांवर टिकाऊपणा व सातत्याने उत्तम कामगिरी देते. हे लाँच शहरी ते अर्ध-शहरी व ग्रामीण भागांपर्यंतच्या फूटबॉलपटूंना भारतातील वाढत्या फूटबॉल समुदायाशी जुळून जाणारे उच्च दर्जाचे, किफायतशीर व सहजसाध्य इक्विपमेंट देण्याप्रती डिकॅथलॉनची कटिबद्धता दृढ करते.
हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : ऑस्ट्रेलियाचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा
या लाँचबाबत मत व्यक्त करत डिकॅथलॉन इंडियाचे स्पोर्टस् डायरेक्टर हान्स पीटर जेन्सन म्हणाले, ”फूटबॉल खेळापेक्षा अधिक आहे, ते पॅशन, समुदायीत्व आणि एकत्र खेळण्याच्या आनंदाचे साजरीकरण आहे. भारतात क्रीडामध्ये सांस्कृतिक वाढ दिसून येत आहे, ज्यामध्ये स्वयं-अभिव्यक्ती, एकत्रित उत्साह आणि क्षणांचा आनंद घेण्याचा रोमांच सामावलेला आहे. किपस्टा रेसिस्ट सिरीजमधून हा उत्साह दिसून येतो, जी कोणत्याही मैदानावर टिकाऊपणा व उत्तम कामगिरीसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे खेळाडू कोणताही विचार न करता हालचाल करू शकतात, नीडरपणे खेळू शकतात आणि खेळाशी जुळून राहू शकतात. डिकॅथलॉनमध्ये आम्हाला या वाढत्या फूटबॉल समुदायाला पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो. तसेच आम्ही सर्व स्तरांमधील खेळाडूंना त्यांची क्षमता ओळखण्यास, त्यांच्या टॅलेंटला साजरे करण्यास व फूटबॉलच्या खऱ्या आनंदाचा अनुभव घेण्यास मदत करत आहोत.”
भारतातील विविध खेळाच्या मैदानांवर सहनशीलता व विश्वसनीयतेसाठी ट्रेनिंग हाय रेसिस्ट बॉल डिझाइन करण्यात आला आहे. मजबूत, घर्षण-रोधक व बाहेरून रबरी आवरण असलेला हा फूटबॉल नियमित प्रशिक्षण व मनोरंजनपूर्ण सामन्यांसाठी दीर्घकाळापर्यंत कार्यक्षमतेची खात्री देतो. खडतर मैदान, चिखल, ग्रॅव्हल आणि कृत्रिम किंवा नैसर्गिक गवत असलेल्या मैदानावर वापरासाठी अनुकूल असलेला हा फूटबॉल टिकाऊपणा व उसळीसाठी फिफा बेसिक मानकांची पूर्तता करतो. हा फूटबॉल किफायतशीर दरामध्ये शक्तिशाली टेक्निकल कार्यक्षमता देतो, ज्यामुळे अधिकाधिक खेळाडू सातत्याने व आत्मविश्वासाने सराव करू शकतात.
क्लब हाय रेसिस्ट बॉल स्पर्धात्मक व क्लब-स्तरीय खेळाचा आनंद देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो सुधारित टिकाऊपणासह उत्तम नियंत्रण देतो. या फूटबॉलवरील बाहेरील रबरी कव्हर लॅमिनेशनसह फोम कोमल अनुभव आणि अचूक प्रतिसाद देते, तसेच खडतर पृष्ठभागांवर प्रतिरोध कायम ठेवते. तसेच, थर्मोफ्यूजन स्टिचिंग तंत्रज्ञान फूटबॉल दीर्घकाळापर्यंत टिकण्याची खात्री देते. कृत्रित व नैसर्गिक गवतापासून ग्रॅव्हल व चिखल अशा विविध मैदानांवर वापरासाठी डिझाइन करण्यात आलेला हा फूटबॉल फिफा बेसिक मानकांची पूर्तता करतो, ज्यामधून दर्जा व सातत्यतेची खात्री मिळते. खेळाचे लोकशाहीकरण करण्यावरील डिकॅथलॉनच्या विश्वासाला सादर करत क्लब हाय रेसिस्ट बॉल किफायतशीर दरामध्ये प्रगत कार्यक्षमता देतो, आपला खेळ उंचावण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या खेळाडूंना साह्य करतो. क्लब हाय रेसिस्ट बॉल मुलांसाठी व्हाइट व ब्ल्यू रंगामध्ये आणि साइज ४ मध्ये उपलब्ध आहे.
रेसिस्ट सिरीजमध्ये ट्रेनिंग रेसिस्ट व क्लब रेसिस्ट मॉडेल्सचा समावेश आहे, जे खेळाच्या विविध स्तरांच्या गरजांची पूर्तता करतात. ट्रेनिंग रेसिस्ट मनोरंजनपूर्ण वापर व कौशल्य विकासासाठी डिझाइन करण्यात आला आहे, तर क्लब रेसिस्ट अधिक स्पर्धात्मक खेळासाठी डिझाइन करण्यात आला आहे. डिकॅथलॉनची किपस्टा रेसिस्ट फूटबॉल सिरीज आता भारतभरातील डिकॅथलॉन स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन www.decathlon.in येथे उपलब्ध आहे. डेकॅथलॉनने एक छोटासा मोहिमेचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. तुम्ही तो येथे पाहू शकता.






