विनेश फोगाट मालामाल : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या गोल्ड मेडल सामान्यामधून डिसक्वालिफाय करण्यात आले होते. आता या सर्व मोठ्या वादानंतर विनेश फोगाट १७ ऑगस्ट रोजी भारतात परतली आहे. यावेळी तिचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विजेंदर सिंह यांनी तिचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत केले आणि विनेश फोगाटच्या आगमनानंतर रोड शो देखील करण्यात आला. विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर ती भावुक होताना दिसले याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये विनेश फोगाटला सरकारकडून आणि इतर ठिकाणांकडून किती बक्षीस रक्कम देण्यात आली आहे याचे फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट एका X अकाउंटने शेअर केली आहे. यामध्ये विनेश फोगाटला किती बक्षीस रक्कम देण्यात आली आहे यासंदर्भात देण्यात आले आहे. यामध्ये लिहिले आहे की, विनेश फोगटला एकूण १६.३० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. विनेश फोगाटला इंटरनॅशनल जाट महासभा, हरियाणा ट्रेड ऑर्गनायझेशन आणि पंजाब जाट असोसिएशनने प्रत्येकी दोन कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत.
व्हायरल झालेल्या पोस्टवर विनेश फोगटचा पती सोमवीर राठीने लिहिले आहे की, ‘विनेश फोगटला खालील संस्था, व्यापारी, कंपनी आणि पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत. तुम्ही सर्व आमचे हितचिंतक आहात, कृपया खोट्या बातम्या पसरवू नका.
विनेश फोगाट तिच्या गावामध्ये आल्यानंतर तिचे जोरदार स्वागत कारण्यात आले. त्याचबरोबर तिथे इव्हेंटचे देखील आयोजन करण्यात आले होते.
निम्नलिखित संस्थाओं, व्यापारियों, कंपनियों और पार्टियों द्वारा विनेश फोगाट को कोई धनराशि प्राप्त नहीं हुई है. आप सभी हमारे शुभचिंतक लोग हैं, कृपया झूठी खबरें न फ़ैलाएँ. इससे हमारा नुक़सान तो होगा ही. सामाजिक मूल्यों का भी नुक़सान होगा.
यह सस्ती लोकप्रियता पाने का साधन मात्र है. pic.twitter.com/ziUaA8ct1W
— Somvir Rathee (@somvir_rathee) August 18, 2024