भारत आणि इंग्लंड(फोटो-सोशल मीडिया)
India vs England : भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत आतापर्यंत ३ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरु असून या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या दरम्यान, इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डकडून पुढील वर्षी २०२६ चा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत पुढील वर्षी पुन्हा इंग्लंड दौरा करणार आहे. त्याच वेळी, भारतीय महिला संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे.
भारतीय संघ पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यात एकूण ८ सामने खेळणार आहे. २०२६ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर, भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. ही मालिका २०२६ च्या जुलैमध्ये सुरू होणार आहे. १ जुलै ते ११ जुलै या कालावधीत पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल. त्यानंतर १४ जुलै ते १९ जुलै २०२६ या कालावधीत एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
या मालिकेला टी२० सामन्याने सुरवात होणार आहे. पहिला सामना १ जुलै २०२६ रोजी डरहममध्ये खेलवण्यात येणार आहे. दुसरा सामना ४ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये, तिसरा सामना ७ जुलै रोजी नॉटिंगहॅममध्ये, चौथा सामना ९ जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये खेळला जाईल. पाचवा आणि शेवटचा सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे.
तसेच टी२० मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना १४ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. त्याच वेळी, दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफ येथे तर तिसरा सामना १९ जुलै रोजी लॉर्ड्स येथे खेळला जाईल. भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळताना दिसणार आहेत.
हेही वाचा : आशिया कप 2025 या दिवशी सुरू होणार, तारीख जाहीर! भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येतील का?
याशिवाय, भारतीय महिला संघ तीन सामन्यांची टी२० मालिका आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. पहिला टी-२० सामना २८ मे २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ३० मे रोजी आणि तिसरा सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. त्याच वेळी, कसोटी सामना १० ते १३ जुलै दरम्यान खेळणार आहे.
दिवसाची तारीख सामना ठिकाण सुरू होण्याची वेळ (IST)






