भारताचे इंग्लंडला 211 धावांचे लक्ष्य (फोटो -bcci)
Smriti Mandhana: आजपासून महिला T20 मालिकेला सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे खेळू शकली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचे नेतृत्व स्मृती मांधनाकडे आहे. आजच्या सामन्यात स्मृती मांधनाने शतकी खेळी केली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 210 धावा केल्या आहेत. भारताने इंग्लंडला 211 धावांचे लक्ष्य दिले आहे. स्मृतीने आज कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. पहिल्या विकटेसाठी तिने 77 धावांची भागीदारी शेफाली वर्मासोबत केली. तिने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे.
Maiden T20I Hundred for Smriti Mandhana! 💯 👌
What a knock from the captain & what a way to bring it up in style 👏
Updates ▶️ https://t.co/iZwkYt7Crg#TeamIndia | #ENGvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/Gv2Yar5R4z
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
स्मृतीने या सामन्यात शतकी खेळी केली आहे. तिने 62 चेंडूमध्ये 112 धावा केल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग ही फॅन कोड आणि सोनी लिव ॲप येथे दाखवली जाणार आहे. या सामन्यांची लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांना सबस्क्रिबशन घ्यावे लागणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. या पहिल्या सामन्याचे आयोजन नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे करण्यात आले आहे.
भारतीय महिला संघ इंग्लड महिला संघाविरुद्ध T20 मालिका त्याचबरोबर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आजपासुन T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये पाच सामने होणार आहेत. तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
पहिला सामना – 28 जून – ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदान
दुसरा सामना – 1 जुलै – सीट युनिक स्टेडीयम
तिसरा सामना – 4 जुलै – द ओव्हल
चौथा सामना – 9 जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवा सामना – 12 जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम