फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नीरज चोप्रा : भारताचा स्टार गोल्डन बॉय नीरज चोप्रा नेहमीच्या त्याच्या कामगिरीमुळे ओळखला जातो. त्याने टोकियो ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली होती आणि जगभरामध्ये त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ त्याने सिल्वर मेडल नावावर केले. त्यानंतर तो दोन स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता, यामध्ये दोन्ही स्पर्धेत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आता तो ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. यामध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला. एक सेंटीमीटरने तो चॅम्पियन होण्यापासून हुकला. बेल्जियमच्या ब्रुसेल्स येथील किंग बौडौइन स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आता सोशल मीडिया भारताचा स्टार गोल्डन बॉय नीरज चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रुसेल्समधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक अतिशय मनोरंजक दृश्याचा व्हिडीओ समोर आला आहे, जिथे युरोपियन महिला नीरज चोप्राचा ऑटोग्राफ आणि सेल्फी घेण्यासाठी हताश दिसत होत्या. व्हिडिओमध्ये पाहिले तर, नीरज प्रथम युरोपियन मुलींना ऑटोग्राफ देतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या मुली एक एक करून नीरजसोबत सेल्फी घेतात. सेल्फी घेत असताना, मुली नीरजशी बोलतात, ज्यामध्ये एक स्त्री त्याचा नंबर विचारू लागते. नीरजला भेटताना, मुली खूप उत्साही दिसतात, यावरून असे दिसून येते की नीरजला भारतात आणि बाहेरही खूप पसंती मिळत आहे आणि मुलींमध्ये तो जास्त प्रसिध्द आहे.
European girls are crazy for Neeraj Chopra 🔥 pic.twitter.com/OI40C8Rmc5
— Johns (@JohnyBravo183) September 16, 2024
ग्रेनेडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्स डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत चॅम्पियन बनला. पीटर्सने 87.87 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह विजेतेपद पटकावले, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या नीरज चोप्राने 87.86 मीटरची सर्वोत्तम थ्रो केली. अशाप्रकारे, नीरज डायमंड लीगचे विजेतेपद जिंकण्यापासून फक्त 1 सेमी कमी होता. नीरज चोप्रा डायमंट लीगच्या फायनलमध्ये दुखापतीसह मैदानात उतरला होता. स्पर्धा संपल्यानंतर नीरजने सोशल मीडियावर 2024 च्या हंगामाविषयी बोलताना एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने दुखापतीबद्दल देखील सांगितले.