‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट
रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड संघाने विश्वचषकापूर्वी फ्लोरिडामध्ये एक प्रॅक्टिस कॅम्प आयोजित केले होते. या काळात संघाने न्यूझीलंड, कोस्टा रिका आणि स्थानिक क्लब मियामी युनायटेड यांच्याविरुद्ध सराव सामने खेळले. प्रॅक्टिस कॅम्प संपल्यानंतर, खेळाडू शनिवारी सकाळी अमेरिकेतील कन्सास सिटी येथील टीम हॉटेलमध्ये पोहोचले. खेळाडू विमानाने पोहोचले तर त्यांचे सामान आधीच रस्ते मार्गाने पोहोचवण्यात आले होते. दरम्यान, वाटेत संघाच्या काही वस्तू चोरीला गेल्या. डेली मेलमधील वृत्तानुसार, चोरांनी खेळाडूंचे बूट, फुटबॉल आणि इतर साहित्य चोरून नेले. या घटनेमुळे इंग्लंड संघात खळबळ उडाली आहे.
England targeted by World Cup heist plot: Stars’ boots and team’s training equipment stolen in transit from Florida to Kansas training base as inquest into extent of theft begins https://t.co/LDbeB8dKRA — Daily Mail Sport (@MailSport) June 13, 2026
ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाचा बेस कॅम्प फ्लोरिडामध्ये होता. संघ फ्लोरिडाहून कन्सास सिटीतील त्यांच्या बेस कॅम्पकडे, म्हणजेच स्वोप सॉकर व्हिलेजकडे, रवाना झाला. खेळाडू कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचले असले तरी, त्यांचे सामान घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला चोरांनी लक्ष्य केले. जेव्हा ते वाहन कन्सास सिटीमध्ये पोहोचले, तेव्हा सर्वांना धक्का बसला. त्या वाहनातून खेळाडूंचे खास तयार केलेले मॅच बूट, अधिकृत मॅच बॉल आणि ट्रेनिंग किट यांसारख्या अनेक अत्यावश्यक वस्तू गायब होत्या. इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने (एफए) या प्रकरणी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. इंग्लंडचा पहिला सामना १८ जून रोजी सकाळी १:३० वाजता डॅलस येथील एटी अँड टी स्टेडियमवर ग्रुप एल मधीलच क्रोएशिया संघाविरुद्ध होणार आहे.
माहितीनुसार, क्रोएशियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून कर्मचारी आता त्यांच्यासाठी नवीन बूट आणि इतर आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत . परंतु, किती खेळाडूंचे सामान चोरीला गेले आणि नुकसानीचे प्रमाण किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
या धक्कादायक घटनेनंतर, कन्सास सिटी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काहींना अटक केली. कन्सास सिटी पोलिसांच्या सांगितले की, ‘तपास वेगाने पुढे जात असून, पुढील तपास होईपर्यंत दोन संशयितांना ताब्यात ठेवण्यात आले आहे.’ इंग्लिश फुटबॉलची नियामक संस्था, फुटबॉल असोसिएशन (FA), देखील त्या वस्तू परत मिळवण्यासाठी कॅन्ससच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत काम करत आहे.
ग्रुप एल मधील इंग्लंडचा पहिला सामना क्रोएशियाविरुद्ध बुधवारी, १७ जून रोजी (भारतात १८ जून रोजी) डॅलसमध्ये होणार आहे . मात्र, सामन्याच्या अगदी आधी झालेल्या या चोरीमुळे थॉमस टुशेलचा संघ एका नव्या पेचात सापडला आहे. या चोरीमुळे संघाच्या सपोर्ट स्टाफसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. तरीही, संघाच्या तयारीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी व्यवस्थापन पर्यायी व्यवस्था आणि नवीन बूट मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच फ्लोरिडामधील इंग्लंड संघाच्या प्रशिक्षण शिबिरापासून काही अंतरावर गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे.
ENG W vs SL W: महिला T20 विश्वचषकाची दणदणीत सुरुवात! इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; मोडले अनेक विक्रम






