Hardik Pandya is the new captain of Mumbai Indians
Follow Us:
Follow Us:
Hardik Pandya Super Car Photo : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकपपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून तो नुकताच सावरला असून, त्याने सरावदेखील करण्यास सुरुवात केली आहे. तो आगामी आयपीएल हंगामाची तयारी करीत आहे. तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे.
हार्दिकच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ
दुबईत झालेल्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून आपल्या गोटात खेचलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिकच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली होती. रोहितच्या यशस्वी कॅप्टन्सीचा वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी हार्दिकवर असणार आहे.
हार्दिक पांड्या युके 07 रायडरशी बोलताना म्हणाला की, ‘माझ्याबद्दल चाहत्यांना एक गोष्ट माहिती नाही. मी घरकोंबडा आहे. मी संघातून जवळपास तीन ते चार महिन्यापासून दूर आहे. मी या काळात फार क्वचितच घराबाहेर पडलो आहे. जर गरज असेलच किंवा ते टाळता येणं शक्य नाही अशा परिस्थितीतच मी घराबाहेर पडलोय. जर माझ्या मित्रांच्या बाबतीत काही झालं तर मी बाहेर पडलो.
मला घरी राहायला आवडत. यावेळी तर मी 50 दिवस घरातून बाहेर पडलो नाही. मी माझ्या घराची लिफ्ट देखील पाहिली नव्हती. माझ्या घरातच जीम आहे, थिएटर आहे. मला माझं घर खूप आवडतं.’
हार्दिकला त्याच्या सुपर कारमधील एका व्हायरल फोटोबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी देखील त्याने आपल्याला काय फरक पडत नाही असे सांगितलं. तो म्हणाला, ‘मी कधी माध्यमांमध्ये वक्तव्य देत नाही. मी कधी हे केलेलं नाही. मला काही फरक पडत नाही.’
दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला वर्ल्डकपचे काही सामने, ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी 20 मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले होते. याचबरोबर मायदेशात झालेल्या अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 मालिकेला देखील मुकला होता.
Web Title: Finally hardik pandya expressed his feelings on that photo they said i never express myself in media nryb