१८ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची निवडणूक पारपडणार आहे. मागील काही वर्ष भारताचा माजी खेळाडू सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले. मात्र पुढील बीसीसीआयच्या कार्यवाहीसाठी नवीन बीसीसीआय अध्यक्ष तसेच समितीची निवडणूक होणार आहे. मात्र एकदा बीसीसीआय अध्यक्षपदावर राहिलेला सौरव गांगुलीचा हा अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
१८ ऑक्टोबरला बोर्डाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. भारताच्या १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या महितीनुसार, रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सौरव गांगुली अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलीय. सौरव गांगुलींना इतर वेगळ्या कामवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचं त्यांनी म्हटल आहे.
बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर सौरव गांगुलीनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. प्रशासक म्हणून त्यांनी दीर्घ खेळी खेळली असून आता त्यांचे लक्ष इतर काही कामांवर आहे. मी बराच काळ प्रशासक राहिलो आहे. पण आता मी माझ्या आयुष्यात पुढे जातोय. मी टीम इंडियासाठी 15 वर्षे खेळलो, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असेल. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. आता माझं लक्ष काहीतरी मोठं करण्यावर आहे असे त्यांनी सांगितले.