Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup विजयानंतर ट्रॉफी मंदिरात नेल्यावरून वाद; कीर्ति आझाद यांच्या विधानावर गौतम गंभीरचा जोरदार पलटवार!

भारताच्या ऐतिहासिक विजय झाला आणि नंतर एका नवीन वादास तोंड फुटलं. माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. त्याच्या या विधानावरुन बऱ्याच चर्चां रंगल्यात

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 11, 2026 | 02:15 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह
  • गौतम गंभीरचं जोरदार प्रत्युत्तर
  • वाद नेमका कुठून सुरू झाला?
Gautam Gambhir hits back : भारताच्या ऐतिहासिक विजय झाला आणि नंतर एका नवीन वादास तोंड फुटलं. माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. त्याच्या या विधानावरुन बऱ्याच चर्चां रंगल्यात. त्यावर गौतम गंभीरने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आझाद यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ही ट्रॉफी 1.4 अब्ज भारतीयांची आहे, त्यामुळे हा फक्त एका धर्माचा विजय असू नये. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी याला अनावश्यक वाद म्हटलं आहे. तर काहींनी याला राजकीय विधान म्हटले.

बस ड्रायव्हरपासून ते भारताला World Champion बनवण्यापर्यंतचा प्रवास, पडद्यामागचा तो ‘अनसंग हिरो’, ज्याचं Viratने आयुष्य बदललं…

गौतम गंभीरचं जोरदार प्रत्युत्तर

आता, गौतम गंभीरने या संपूर्ण प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर म्हणाला, “या प्रश्नाचे उत्तर देण्याचीही गरज नाही. हा संपूर्ण देशासाठी एक मोठा क्षण आहे आणि आपण हा ऐतिहासिक विजय साजरा केला पाहिजे. असे मुद्दे उपस्थित करण्यात काहीही अर्थ नाही. कारण त्यामुळे संघाच्या कामगिरीत उत्साहावर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला त्या 15 खेळाडूंच्या मेहनतीला कमी लेखायचे असेल तर उद्या कोणीही काहीही बोलू शकते.”

गंभीर पुढे म्हणाला, “हा खेळाडूंवरही अन्याय आहे. कल्पना करा की या खेळाडूंनी किती सहन केलं असेल आणि त्यांनी किती दबाव सहन केला असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघ प्रचंड दबावाखाली होता. अशा वेळी असं विधान करणं म्हणजे तुमच्या स्वतःच्या खेळाडूंना आणि तुमच्या स्वतःच्या संघाला कमी लेखणं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे.”

वाद नेमका कुठून सुरू झाला?

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून 2026 चा टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जय शाह यांनी ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिराला भेट दिली. याच सगळ्या प्रसंगावरुन कीर्ती आझाद यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले की, ट्रॉफी मशीद, चर्च किंवा गुरुद्वारात का नेण्यात आली नाही. ही ट्रॉफी 1.4 अब्ज भारतीयांची आहे, जे प्रत्येक धर्माचे प्रतिनिधित्व करतात. हा कोणत्याही एका धर्माच्या विजयाचा उत्सव नाही.

हाफ पँट, पायात स्लीपर्स; Sanju Samsonच्या वडिलांचा ‘हा’ साधेपणा जिंकतोय सर्वांची मनं, Video Viral

मोठी चॅलेंजसना सामोरं जात टीम इंडियाचा विजय

या स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास सोपा नव्हता. सुपर 8मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना बराच ताण सहन करावा लागला. पहिल्याच टप्प्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर संघावर प्रचंड दबाव होता. पण भारताने जोरदार पुनरागमन केलं आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवले आणि नंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून इतिहास रचला. या विजयासह, भारत तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.

Web Title: Gautam gambhir hits back at kirti azad over temple visit row after t20 world cup 2026 win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • cricket news
  • Gautam Gambhir
  • ICC T20 World Cup 2026
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…
1

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास
3

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय
4

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.