जेम्स अँडरसन(फोटो-सोशल मीडिया)
James Anderson will play in Manchester : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. क्रिकेट विश्वाचं या मालिकेकडे लक्ष्य लागून आहे. या मालिकेतील ३ सामने खेळवले गेले असून इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली आहे. अशातच इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जेम्स अँडरसन चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने जुलै २०२४ मध्ये लॉर्ड्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तथापि, तो अजूनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहे. जेम्स अँडरसनने अलीकडेच ११ वर्षांनंतर टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तो इंग्लंडच्या प्रसिद्ध टी२० लीग व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये खेळला आहे. जिथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. ज्यामुळे त्याला आता मोठी संधी चालून आली आहे.
इंग्लंडच्या प्रसिद्ध १००-बॉल क्रिकेट लीग, द हंड्रेडच्या २०२५ च्या हंगामासाठी वाइल्डकार्ड ड्राफ्टमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ४२ वर्षीय जेम्स अँडरसनचे नावदेखील सामील आहे. द हंड्रेड ५ हंगाम ऑगस्टपासून सुरू होणार आहे, त्यापूर्वी सर्व ८ संघांकडून वाइल्ड कार्ड खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अँडरसन या वेगवान गोलंदाजाची निवड मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने केली आहे. इंग्लंडचा हा दिग्गज गोलंदाज द हंड्रेड लीगमध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : लॉर्ड्सवर गिल सेनेचा पराभव, तर सारा तेंडुलकर दिसली पार्टी एन्जॉय करताना; नेमकं प्रकरण काय?
जेम्स अँडरसनने टी२० ब्लास्टमध्ये केलेली दमदार कामगिरी केली आहे. त्या जोरावर त्याला ही संधी देण्यात आली आहे. त्याने अलिकडेच टी२० ब्लास्टमध्ये लँकेशायरकडून खेळताना ८ सामन्यात १४ बळी घेतले आहेत. यावेळी त्याने ७.७५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. अँडरसनने आतापर्यंत एकूण ५२ टी२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ५५ बळी मिळवले आहेत. त्याने इंग्लंड संघाकडून १९ टी२० सामने खेळून त्यामध्ये त्याला फक्त १८ बळी घेता आले आहेत. इतकेच नाही तर अँडरसनने आयपीएल २०२५ साठी देखील आपले नाव दिले होते, परंतु त्याला लिलावासाठी शॉर्टलिस्ट केले गेले नव्हते.