फोटो सौजन्य - X
Sports Ministry’s big decision for wrestlers : आता कुस्तीपटूंसाठी एक आनंदाची बातमी क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी म्हणजेच ११ मार्च रोजी भारतीय कुस्ती महासंघावरील (WFI) निलंबन मागे घेतले आहे, यामुळे आता देशांतर्गत स्पर्धांचे आयोजन करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग कुस्तीपटूंसाठी मोकळा झाला आहे. फेडरेशनचा दर्जा NSF म्हणून पुनर्संचयित करण्यात आला आहे. मंगळवारी क्रीडा मंत्रालयाने निलंबन मागे घेतले, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघ निवडीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा भारतात परतला, चाहत्यांनी केले विमानतळावर जंगी स्वागत, Video Viral
क्रीडा मंत्रालयाने २४ डिसेंबर २०२३ रोजी १५ वर्षांखालील (Under – 15) आणि २० वर्षांखालील (nder – 20) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या घाईघाईच्या घोषणेमुळे नाराज होऊन भारतीय कुस्ती महासंघला निलंबित केले होते, परंतु आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ डिसेंबर २०२३ रोजी निवडणुका जिंकल्या होत्या, परंतु माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंडा येथील नंदिनी नगरला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे ठिकाण बनवण्याच्या निर्णयावर सरकार नाराज झाल्यानंतर WFI निलंबित करण्यात आले.
आता मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की WFI ने त्यांचे कामकाज आणि व्यवस्था सुधारली आहे, म्हणून निलंबन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा कुस्तीगीरांना खूप फायदा होईल. वरिष्ठ कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी चाचण्या देऊ शकतील, तर ज्युनियर कुस्तीगीर राज्य पातळीवर खेळण्यासाठी चाचण्या देऊ शकतील.
Champions Trophy 2025 च्या फायनलच्या सामन्यात एकही PCB चा अधिकारी नाही? ICC ने केले स्पष्ट
माजी महासंघ प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर ७ महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. आरोपीच्या अटकेसाठी जंतरमंतरवर निदर्शने करण्यात आली. या काळात झालेला गोंधळ संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिला. अशा वेळी भारताचे अनेक दिग्गज कुस्तीपटू हे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्या घटनेचा देशभर आणि जगभरात निषेध करण्यात आला. बृजभूषण यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या महासंघाच्या निवडणुका रद्द कराव्यात आणि नवीन नियुक्त्या बेकायदेशीर घोषित कराव्यात यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर, २१ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा निवडणुका झाल्या आणि बृजभूषण यांचे सहकारी संजय सिंग यांना प्रमुख बनवण्यात आले.
यावेळी अनेक महिला कुस्तीपटूंना अत्यंत खराब वागणूक देण्यात आली होती. सोशल मीडियावर यावेळी मोठ्या प्रमाणात सरकारला ट्रोल करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यवर देखील टीका करण्यात आली होती.






