फोटो सौजन्य - Mumbai Airport सोशल मीडिया
Captain Rohit Sharma returns to India after winning the Champions Trophy : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने किवी संघाला पराभूत करून २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी डान्स करून त्याचबरोबर संपूर्ण मैदानामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवून आनंद साजरा केला. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणांत भारतीय खेळाडूंचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताचे खेळाडूंचे भारतामध्ये आगमन झाले आहे आणि यावेळी क्रिकेट चाहत्यांनी मुंबई विमानतळावर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याची मुलगी समायरा आणि त्याची पत्नी रितिका यांच्यासोबत चॅम्पियन झाल्यानंतर तो पहिल्यांदाचं मुंबईमध्ये आला. यावेळी त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याचबरोबर कॅप्टन रोहित शर्माच्या नंतर हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर,वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा हे देखील चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये आले. यावेळी सर्व क्रिकेट खेळाडूंचे विमानतळावर मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.
A Champion’s homecoming! Mumbai Airport proudly welcomes Indian Cricket Captain Rohit Sharma as he returns victorious from the Champions Trophy 2025. A moment of pride for the city and the entire nation! #WelcomeHome #RohitSharma #ChampionsTrophy2025 #MumbaiAirport pic.twitter.com/DL46UnOSvM — Mumbai Airport (@CSMIA_Official) March 10, 2025
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकले होते यावेळी त्यांनी पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. किवी संघाने पहिले फलंदाजी करत २५२ धावांचे लक्ष्य उभे केले होते यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली आणि मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. कॅप्टन रोहित शर्माने संघासाठी ७६ धावा केल्या आणि त्या धावा टीम इंडियासाठी निर्णायक ठरल्या. त्याचबरोबर भारताचा उपकर्णधार शुभमन गिल बद्दल बोलायचं झालं तर त्याने संघांसाठी ३१ धावा केल्या होत्या. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली फायनलच्या सामन्यामध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही.
कॅप्टन रोहितचा विकेट गेल्यानंतर श्रेयस अय्यरने खेळ सांभाळला आणि संघासाठी महत्त्वाच्या धावा केल्या तर दुसऱ्या बाजूने अक्षर पटेलने भारतीय संघाची खेळी सांभाळले. त्यांनतर केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सामना संपवण्याचे काम केले. भारताच्या संघाने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.