जोस बटलर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. तो शुभमन गिलसोबत सलामीला येत आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी, आतापर्यंत त्याची खेळी फक्त एकाच सामन्यात पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध ७३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या शानदार खेळीमुळे गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला.तथापि, गुजरात टायटन्सने आतापर्यंत मालिकेतील ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये जोसने आपल्या वेगवान धावांनी संघाला बळकटी दिली आहे. २०२४ पेक्षा यावेळी जोस चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सने त्याला खरेदी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरत आहे. या हंगामात जोस हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.
हेही वाचा : MI vs SRH : मुंबईचा स्पर्धेतील तिसरा विजय, वानखेडेवर सनरायझर्स हैदराबादला MI ने 4 विकेट्सने केलं पराभूत
हेही वाचा : RCB Vs PBKS : बंगळुरूच्या फलंदाजांचा सर्वोत्तम प्रदर्शन करण्यावर भर, पंजाबच्या फिरकीचे आरसीबीपुढे आव्हान..
आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी करुन सामना आपल्या बाजूला फिरवला. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजाचीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड हे दोन्ही खेळाडू फार मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरले. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद 4 विकेट्सने पराभूत केले आहे. हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय आहे तर या स्पर्धेचा मुंबईचा हा तिसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला या स्पर्धेचा पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.