फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad match report : वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला होता. आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली. आजच्या सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड हे दोन्ही खेळाडू फार मोठी कामगिरी करू शकले नाही. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद 4 विकेट्सने पराभूत केले आहे. हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय आहे तर या स्पर्धेचा मुंबईचा हा तिसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला या स्पर्धेचा पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रायन रिकेल्टन याने संघासाठी २३ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या, यामध्ये त्यानं ५ चौकार मारले. रोहित शर्मा या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने या सामन्यात १६ चेंडू खेळले आणि यामध्ये त्याने २६ धावा केल्या आणि विकेट गमावली. विल जॅक्स यान संघासाठी गोलंदाजी देखील चांगली केली त्याचबरोबर त्याने संघासाठी महत्वाच्या २६ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या बॅटने या सामन्यात महत्वाच्या २६ धावा आल्या.
Match 33. Mumbai Indians Won by 4 Wicket(s) https://t.co/8baZ67XxKu #MIvSRH #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
पाहिले फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ५ विकेट्स गमावून २० ओव्हरमध्ये १६२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सच्या संघाने हा लक्ष्य ६ विकेट्स गमावून १८.१ ओव्हरमध्ये पूर्ण केले. आजच्या सामन्यांमध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी संथ गतीने धावा केल्या आणि या धावा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी सहज केल्या.
DC Vs RR सामन्यात संजू सॅमसनला मिळाली वॉर्निंग, पंचांनी का फटकारले? नक्की प्रकरण काय वाचा सविस्तर
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. अभिषेकने २८ चेंडूत ४० धावा केल्या. तथापि, हेडला धावा काढण्यात अडचण आली आणि तो २९ चेंडूत फक्त २८ धावा करू शकला. इशान किशनची बॅट पुन्हा एकदा फ्लॉप झाली आणि तो २ धावा करून बाद झाला. नितीश रेड्डी १९ धावा करून बाद झाला. हेनरिक क्लासेन आणि अनिकेत वर्मा यांनी शेवटच्या षटकांमध्ये स्फोटक फलंदाजी केली, ज्यामुळे संघाला १६२ धावांचा सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. क्लासेनने २८ चेंडूत ३७ धावा केल्या, तर अनिकेत ८ चेंडूत १८ धावा करून नाबाद राहिला.