हार्दिक पांड्या अनन्या पांडे : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani and Radhika Merchant) यांचा १२ जुलै रोजी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. हार्दिक पांड्या या त्याच्या खासगी जीवनामुळे त्याचबरोबर त्याच्या फॉर्ममुळे चर्चेत असतो. भारतातूनच नाही जगभरामधून पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाच्या या भव्य दिव्य विवाह सोहळ्यामध्ये हार्दिक पांड्या सुद्धा त्याच्या हटके अंदाजात पाहायला मिळाला. हार्दिक आणि त्याचा मुंबई इंडियन्स मित्र ईशान किशनसोबत तो अनंत राधिकाच्या लग्नामध्ये दिसला आहे. नुकताच हार्दिक पांड्याचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पंड्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात आपला भाऊ कृणाल पांड्या आणि मित्र इशान किशनसोबत पोहोचला होता. लग्नात अनन्या पांडे एकटीच सहभागी झाली होती. हे दोघेही शाहरुख खानच्या ‘गोरी गोरी’ गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसले. या लग्नाला हार्दिक बरीच धमाल करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर आले आहेत. यामध्ये तो वेगवेगळ्या गायकांसोबत नाचताना दिसत आहे.
VIDEO | Cricketer Hardik Pandya (@hardikpandya7) and actress Ananya Panday (@ananyapandayy) groove to music at the wedding of Anant Ambani and Radhika Merchant in Mumbai. #AnantRadhikaWedding pic.twitter.com/zxYWuQcjxm
— Press Trust of India (@PTI_News) July 12, 2024
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे सुद्धा त्यांच्या परिवारासोबत लग्नाला उपस्थित होते. त्याचबरोबर चॅम्पियन गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या पत्नीसोबत दिसला. या लग्नाला इतर अनेक क्रिकेटर्सनीही हजेरी लावली होती. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.