फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
हार्दिक-नताशा : हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला आहे. यासंदर्भात माहिती त्यांनी दोघांनी स्वतःहून दिली आहे. त्याच्या घटस्फोटांच्या बातम्या मागील सहा महिन्यांपासून सुरु आहेत. ४ वर्ष त्यानी सुखी संसार केला आणि ४ वर्षांमध्ये त्यांनी ३ वेळा लग्नसुद्धा केले होते. त्याचबरोबर त्या दोघांचा एक मुलगा सुद्धा आहे. घटस्फोटांची सोशल मीडियावर शेअर करण्याच्या आधी नताशा ती तिच्या घरी एक दिवसाआधीच निघाली होती. तिचा मुलगा अगस्त्यासोबत मागील आठवड्यामध्ये सर्बियातील तिच्या मूळ गावी मुंबई सोडून गेलेल्या नताशाला या आव्हानात्मक काळात तिच्या कुटुंबियांकडून सांत्वन मिळत आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि तिचे आणि तिच्या मुलाचे शेअर केले होते. आता तिने एक इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे यावर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे.
नतासा स्टॅनकोविचने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही तिचा मुलगा अगस्तचे काही फोटो शेअर केले आहेत आणि तिने कॅप्शनमध्ये हार्ट ईमोजी लावला आहे. यावर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने दोन वेळा कमेंट्स केली आहे. हार्दिक पांड्याने हार्ट ईमोजीचे एक कॉमेंट्स केली आहे तर दुसरी दुसरं आहे अशा प्रकारची टिपणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटस्फोटांची बातमी सोशल मीडियावर शेअर करताना त्याने आई वडिलांबाबत स्पष्ट केले होते.
दोघांनीही घटस्फोटांची बातमी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंवर शेअर करून सांगितले होते की ते दोघे वेगळे झाले आहेत. यावेळी हार्दिक पांड्या म्हणाला होता की, “४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर हार्दिक आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्रितपणे आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि आमचे सर्व काही दिले आणि आम्हाला विश्वास आहे की हे आम्हा दोघांच्या हिताचे आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य लक्षात घेऊन आणि आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आम्ही अगस्त्यला आशीर्वाद आहोत, जो आमच्या दोन्ही जीवनाच्या केंद्रस्थानी राहील आणि त्याच्या आनंदासाठी आम्हाला जे काही करता येईल ते देऊ याची खात्री करण्यासाठी आम्ही सह-पालक राहू. या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला गोपनीयता देण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनाची आणि समजून घेण्याची मनापासून विनंती करतो.”