Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 पूर्वी KKR ला मोठा धक्का! गौतम गंभीरचा ‘हुकुमाचा एक्का’ स्पर्धेबाहेर; आता कोणाला मिळणार संधी

KKR संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून अधिकृतपणे बाहेर झाला आहे. केकेआर आपला पहिला सामना 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 09:29 PM
IPL 2026 पूर्वी KKR ला मोठा धक्का! (Photo Credit- X)

IPL 2026 पूर्वी KKR ला मोठा धक्का! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • IPL 2026 पूर्वी KKR ला मोठा धक्का!
  • गौतम गंभीरचा ‘हुकुमाचा एक्का’ स्पर्धेबाहेर
  • आता कोणाला मिळणार संधी
Harshit Rana has been ruled out of the IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाला स्पर्धेपूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून अधिकृतपणे बाहेर झाला आहे. केकेआर आपला पहिला सामना 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.

टी-२० वर्ल्ड कपपूर्वी झाली होती दुखापत

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, हर्षित राणा टी-20 वर्ल्ड कपपूर्वी एका सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी हंगामात खेळू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. हर्षितच्या जागी अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूची घोषणा केकेआरने केलेली नाही.

🚨 REPORTS 🚨 Harshit Rana has been ruled out of the IPL 2026 due to injury. ❌ (Source – TOI)#Cricket #IPL #KKR pic.twitter.com/ZP3oRoTWE0 — Sportskeeda (@Sportskeeda) March 13, 2026

IPL 2026 साठी BCCI चे नवे नियम! सराव सत्र मार्गदर्शक तत्त्वे केली जारी, संघ आता हे करू शकणार नाहीत…

फेब्रुवारीमध्ये पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया

हर्षित राणाच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हर्षितने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. “शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, आता माझे संपूर्ण लक्ष रिकव्हरीवर आहे. ज्या खेळावर मी मनापासून प्रेम करतो, तिथे लवकर परतण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते. आयपीएलपर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आशा चाहत्यांना होती, मात्र पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला अद्याप काही काळ लागणार आहे.

झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीची केकेआरमध्ये एन्ट्री

हर्षित राणा बाहेर झालेला असतानाच, केकेआरने झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानी याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. ६ फूट ८ इंच उंचीचा हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या भेदक मारा आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंसाठी ओळखला जातो. त्याने 80 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 21 च्या सरासरीने 90 हून अधिक बळी घेतले आहेत. मुजरबानी 17 मार्च रोजी कोलकाता येथे पोहोचणार असून तो संघासोबत सराव सत्रात सहभागी होईल.

आयपीएल 2026 साठी कोलकाता नाइट रायडर्सचा संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, कॅमरन ग्रीन, फिन ॲलन, तेजस्वी सिंह, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, रोवमन पॉवेल, अनुकूल रॉय, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, रमनदीप सिंह, वैभव अरोरा, मथीशा पथिराना, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, आकाश दीप, उमरान मलिक, ब्लेसिंग मुजरबानी.

मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई, IPL 2026 पूर्वी केकेआरच्या माजी खेळाडूवर आयसीसीची बंदी

Web Title: Harshit rana has been ruled out of the ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • cricket news
  • Harshit Rana
  • IPL 2026
  • KKR
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
2

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
3

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.