काल मुंबई क्रिकेट असोशिएशनची (Mumbai Cricket Association) निवडणूक पार पडली. या निवणुकीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandip Patil) आणि अमोल काळे यांच्यात अध्यक्ष पदाची चुरस पहायला मिळाली. यात शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनेलचे अमोल काळे यांचा विजय झाला असून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील पराभूत झाले.
काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत. पराभवानंतर संदीप पाटील प्रतिक्रिया देताना म्हंटले अगदी खेळकर वृत्तीने मी हा पराभव स्विकारत आहे, मी या पुढेही संधी मिळेल तेव्हा मुंबई क्रिकेटसाठी काम करेन असे ते म्हणाले.
एका क्रिकेटरविरुद्ध निवडणुकीत सर्व राजकारणी एकत्र येतात तेव्हा कसं वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘सर्व राजकारणी एकत्र आले याचा मला आनंद आहे, माझ्याविरुद्ध निवडणुकीसाठी का होईना, ते एकत्र आले हे चांगलं आहे. ते असेच एकत्र राहावे आणि मुंबई क्रिकेटसाठी चांगलं काम करावं. तसंच क्रिकेट महत्त्वाचं आहे संदीप पाटील नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच मी जोवर हयात आहे तोवर मुंबई क्रिकेटसाठी काम करेन अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन देखील केले. मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक अतिशय रंगतदारपणे पारपडली.