रोहित शर्मा, रवींद्र जडेजा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरवात होणार आहे. भारतीय संघाची धुरा युवा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेच्या संघ निवडीनंतर रोहित शर्माची कसोटी संघात त्याची जागा कोण घेणार हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळणे अपेक्षित मानले जात आहे. त्याच वेळी, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, कुलदीप यादवने रोहित शर्मा या माजी कसोटी कर्णधाराबाबत एक मोठा खुलासा केला आहे. कुलदीपने रोहित शर्मा टीम बसमध्ये बसत असलेल्या सीटवर बसत आता बसत असलेल्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
कुलदीपने माध्यमांशी संवाद साधाला तेव्हा त्याने सांगितले की, “आता मी टीमच्या बसमध्ये रोहित शर्माच्या सीटवर बसतो.” कुलदीप पदुहे म्हणाला की, “आता मी त्या सीटवर बसतो. मी कधीही रोहित भाईची जागा घेऊ शकणार नाही, मी फक्त जड्डू भाईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. फिरकी गोलंदाज म्हणून माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. आता टीममध्ये ऐश भाई नाहीये. मी त्याच्याकडून देखील खूप काही शिकलो आहे.”
हेही वाचा : ENG vs IND : ‘आनंदी, सुरक्षित अशी संस्कृती निर्माण करू..’, भारताच्या नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलचा दावा..
अधिक माहितीसाठी, कुलदीप यादवने २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे, जिथे त्याने त्याच्या ९ षटकांच्या गोलंदाजी दरम्यान त्याला एक देखील विकेट मिळवता आलेली नाही आहे. हा मनगटीचा फिरकी गोलंदाज परदेशी परिस्थितीत संघाचा आवडता फिरकी गोलंदाज राहिला नाही, त्यामागील कारण त्याने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये फक्त दोनच सामने खेळलेले आहेत. पण, यावेळी मात्र, कुलदीप यादवकडे एक्स फॅक्टर म्हणून पाहिले जात आहे. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाता आहे.