लाहोर : आशिया कप 2023 (Asia Cup) अंतर्गत सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात काल (बुधवारी) पाकिस्तानने बांगलादेशवर (Pak vs Ban) दणदणीत सात विकेट राखत विजय मिळवला. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांग्लादेशला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशला 192 धावांपर्यंतच मजल मारता आली. शाकीबने 53 आणि मुशफिकर याने 64 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरीस रऊफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नसीम शाह याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर फहीम अश्रफ आणि शाहीन अफ्रिदी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. कॅप्टन शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम दोघांनी शतकी भागीदारी करत बांगलादेशला 192 धावांपर्यंत पोहचवलं. (Imam-ul-Haq-Mohammed Rizwan play decisive knock in Pakistan’s resounding win over Bangladesh by 7 wickets)
Lahore witnesses a Haris Rauf special, as Pakistan win the first Super-four stage game of Asia Cup 2023
Read more ➡️ https://t.co/GnQG5kP5Zh#PAKvBAN | #AsiaCup2023
— PCB Media (@TheRealPCBMedia) September 6, 2023
ईमाम उल हक-रिझवानची झुंझार खेळी
दरम्यान, 193 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला पाकिस्तान संघाने संयमी सुरुवात करीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली. पाकिस्तानकडून ईमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी अर्धशतकं ठोकली. फखर झमान याने 20 आणि कॅप्टन बाबर आझम याने 17 धावांचं योगदान दिलं. ईमाम उल हक याने 84 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 78 धावांची अर्धशतकी खेळी केली. 193 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आणि सुपर फोरमधला पहिला विजय मिळवला. आता पाकिस्तानची गाठ बलाढ्य भारताशी रविवारी पडणार आहे.
बांग्लादेशला दोन्ही सामने जिंकावेच लागतील
या विजयासह पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा आता आणखी वाढल्या आहेत. तर बांगलादेशला आव्हान कायम राखण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. बांग्लादेशचा पुढील सामन भारत आणि श्रीलंका यांच्याबरोबर होणार आहे.