फोटो सौजन्य - Social Media
मुंबई : मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा वानखेडे स्टेडियम येथे नवीन लॉन तयार करण्यात आले आहे. या लॉनचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले आहे. या कार्यक्रमावेळी राज्याचे मंत्री आशिष शेलार तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे (MCA) अजिंक्य नाईक उपस्थित होते. तसेच हे लॉन मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे तयार करण्यात आले आहे. तसेच या उदघाट्न कार्यक्रमाचे आयोजनही मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी जमलेल्या तमाम क्रिकेट चाहत्यांचे संबोधन केले. ते म्हणाले की,” मुंबई क्रिकेटने अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि उत्तम खेळाडू घडवले. या यशात खेळाडूंसह क्लब सदस्यांचा मोलाचा वाटा आहे.” नवीन लॉनच्या निर्मितीचे कौतुक करत ते म्हणाले, “हे लॉन क्लब सदस्यांना उत्तम सुविधा देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला मान देण्याचा प्रयत्न आहे.” त्यांनी महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आणि डायना एडल्जी यांच्या योगदानाचा सन्मान करावा, अशी सूचना केली. “महिलांच्या क्रिकेटमधील योगदानाची नोंद घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
उपस्थितांच्या उत्साहाचे कौतुक करत पवार यांनी एमसीएबद्दलची आत्मीयता कायम असल्याचे सांगितले. त्यांनी नवीन वर्षात सर्वांना सुख, समृद्धी आणि चांगल्या क्रिकेट अनुभवाच्या शुभेच्छा दिल्या. हा सोहळा मुंबई क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरला.
शरद पवारांच्या या भाषणात मुंबई आणि मुंबईचे क्रिकेट योगदान हा महत्वाचा मुद्दा उठून दिसला. येथील खेळाडू तसेच खेळाडूंना घडवणारे क्रिकेट क्लब यांचे किती महत्वाचे योगदान असल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात धरून ठेवले तसेच महिलांच्या क्रिकेटलाही आणखीन प्रोत्साहन देण्याचे येण्याचे आवाहन त्यांनी केले आणि सर्व क्रिकेटप्रेमींना शुभेच्छा दिल्या.






