ऑस्ट्रेलिया संघात भारताविरुद्ध मोठे बदल(फोटो-सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलियन संघात या करण्यात आलेल्या बदलात नऊ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचे संघात पुनरागमन झाले आहे. जो त्याच्या दुखापतीतून सावरत असल्याचे दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी नेट प्रॅक्टिस सेशनदरम्यान मॅक्सवेलच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले, ज्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागले.परंतु, तो आता भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात परतणार आहे.
हेही वाचा : “आई शपथ घे, मागे हटणार…” युजवेंद्र चहलने धनश्रीवर साधला पुन्हा निशाणा; नेमकं प्रकरण काय?
ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघात आणखी चार खेळाडूंबद्दल माहिती समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. ग्लेन मॅक्सवेल पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही. परंतु तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. बेन द्वारशुइसची चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी संघात निवड केली गेली आहे. वीस वर्षीय वेगवान गोलंदाज महली बियर्डमनची तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी संघात स्थान दिले गेल आहे. याशिवाय, जोश फिलिप पाचही टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० सामन्यांमधून दोन खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात स्थान देण्यात आल्यावर बाहेर ठेवण्यात आलेला जोश हेझलवूड हा पहिला खेळाडू असणार आही. तसेच वगळण्यात येणारा दुसरा खेळाडू शॉन अॅबॉट असणार आहे. जो पहिल्या तीन टी-२० सामन्यात खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी त्यांच्या एकदिवसीय संघात देखील बदल केले आहेत. भारताविरुद्धचा त्यांचा शेवटचा एकदिवसीय सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये जॅक एडवर्ड्स आणि मॅट कुनहेमन संघात परतले आहेत. यावेळी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मार्नस लाबुशेनला संघातून डच्चू देण्यात आला.






