अफगाणिस्तानचे भारतासमोर 310 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघ आणि अफगाणिस्तान १९ वर्षांखालील सघ यांच्यात सामना सुरू आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात टॉस जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत फैसल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई या जोडीच्या शतकांच्या जोरावर ४ गडी गमावून ३१० धावा केल्या आहेत. भारताला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी ३११ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून दीपेश देवेंद्रनने आणि कानिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या या दुसऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने चांगली सुरुवात केली. उस्मान सादात आणि खालिद अहमदझाई या जोडीने चांगली सुरुवात केली. दोघांनी ५३ धावांची सलामी भागीदारी रचली. नंतर खालिद अहमदझाई ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर फैसल शिनोजादा मैदानावर आला. त्यानंतर लगेचच उस्मान सादात ३९ धावा करून बाद झाला. त्याला कानिष्क चौहानने बाद केले.
Faisal Khan steps up on the big stage as he brings up a superb century in the #U19WorldCup semi-final 🤩 Watch more action LIVE, broadcast details 👉 https://t.co/jKX6xmmOJQ pic.twitter.com/Vl7uqiejPo — ICC (@ICC) February 4, 2026
त्यानंतर मात्र फैसल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई यांनी डाव सावरला. दरम्यान, फैसल शिनोजादाने ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत १४ चौकार मारले. तसेच संघाला २३० च्या पुढे नेण्यास मदत केली. दरम्यान, त्याला साथ देणाऱ्या उझैरुल्ला नियाझाईने देखील शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी १४८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर फैसल शिनोजादा ९३ चेंडूत ११० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १५ चौकार मारले. त्याला दीपेश देवेंद्रनने बाद केले. उझैरुल्ला नियाझाईने तळाचे अझिझुल्लाह मियाखिल अब्दुल अझीझ यांच्यासोबत छोटी भागीदारी रचत संघाची धावसंख्या ३१० यापर्यंत पोहचवली. उझैरुल्ला नियाझाईने ८६ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या तर अब्दुल अझीझ ७ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून दीपेश देवेंद्रनने आणि कानिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
Uzairullah Niazai scripts up a magnificent #U19WorldCup semi-final century 🔥 Watch more action LIVE, broadcast details 👉 https://t.co/jKX6xmmOJQ pic.twitter.com/5WrnzjcWwe — ICC (@ICC) February 4, 2026
हेही वाचा : IND U19 vs AFG U19,U19 WC 2026 : भारताच्या अडचणी वाढल्या! हरारेमध्ये फैसल शिनोजादाचा शतकी तडाखा
भारत १९ वर्षांखालील संघ : आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघ : उस्मान सादात, खालिद अहमदझाई, फैसल शिनोजादा, उझैरुल्ला नियाझाई, महबूब खान(यष्टीरक्षक/कर्णधार),, अझिझुल्लाह मियाखिल, अब्दुल अझीझ, खातीर स्टॅनिकझाई, रूहुल्ला अरब, नूरिस्तानी ओमरझाई, वाहिदुल्ला झदरन






