सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मिडिया)
MI vs PBKS : आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यातआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 20 ओवर मध्ये १८४ धावा केल्या होत्या. पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून सहज विजय मिळवला. जरी या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला नसला तरी मुंबईच्या मिस्टर ३६० म्हणजेच सूर्यकुमार यादवने अनेक विक्रम रचले आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध २५ धावा करताच तो एका हंगामात सर्वाधिक २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्यानंतर त्याने ३६ पेक्षा जास्त धावा करून सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांचा जुना विक्रम देखील मोडीत काढला आहे.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा १५ वर्षे जुना विक्रम मोडून एक नवीन विक्रम रचला आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात ६१९ धावा करून सूर्यकुमार यादवने सचिन तेंडुलकरचा ६१८ धावांचा महारेकॉर्ड मागे टाकला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा
सूर्यकुमार यादवने या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी ६०० धावा केल्या आहेत. त्याने एकाहून अधिक हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असे करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. २०२३ मध्ये त्याने ६०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता या हंगामात त्याने ६३० पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार केला आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात सूर्यकुमार यादवने ३९ चेंडूत खणखणीत ५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले आहेत. त्याच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सला १८० चा आकडा पार करता आला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘पण BCCI ने त्याला कोणताही आदर..’ महिला क्रिकेटपटूचे बोर्डावर गंभीर ताशेरे, वाचा प्रकरण काय?
आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सने ७ विकेट्स गमावून १८४ धावा उभारल्या. मुंबईकडून रायन रिकेल्टनने २७, रोहित शर्माने २४ केल्या तसेच एका टोकाला धरून राहिलेल्या सूर्यकुमार यादवने ५७ धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने, मार्को जानसेनसह विजय कुमार व्यास यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत. प्रतिउत्तरात प्रियांश आर्या आणि जोश इंग्लिश यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून सहज विजय मिळवला.