भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना ९ फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या अंतिम इलेव्हनवर असणार आहेत. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला. टीम इंडियाने मालिकेत आधीच १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचे लक्ष्य हा सामना जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेणे आहे. त्याच वेळी, इंग्लंड संघ हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करू इच्छितो. याचदरम्यान आता भारताचा संघ सामन्याआधी मैदानात घाम गाळत आहे त्याच्या खास फोटोंवर नजर टाका.
भारतीय संघाचे दुसऱ्या सामन्याआधीचे सरावाचे काही खास फोटो. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
कटक हे भारतासाठी एका अभेद्य किल्ल्यासारखे बनले आहे. भारताला येथे शेवटचा एकदिवसीय सामना २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हरवला होता. तेव्हा टीम इंडियाचा येथे ४ विकेट्सने पराभव झाला होता.
टीम इंडियाने येथे ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि सर्व सामने जिंकले आहेत. कटकचे मैदान भारतीय संघाचा एक अजिंक्य किल्ला आहे, जिथे भारताला हरवणे कठीण आहे.
भारताने १९८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळला. भारताने हा सामना जिंकला होता. आतापर्यंत या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण ५ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन आणि इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत.
दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात तो पुनरागमन करत आहे. त्याच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. त्याला या सामन्यात मोठी खेळी करायची आहे.
कटकच्या मैदानावर भारताने आतापर्यंत १७ सामने खेळले आहेत. यापैकी भारताने १३ सामने जिंकले आहेत आणि चार सामने गमावले आहेत. या मैदानावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दोन आणि न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एक एकदिवसीय सामने गमावले आहेत.