Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ची लढत! लॉर्ड्सची खेळपट्टी ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या पिच रिपोर्ट, संभाव्य प्लेइंग 11

IND vs ENG 3 rd ODI Pitch Report: भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा वनडे सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 01:15 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ची लढत
  • भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट
  • दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावक रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३. ३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. अर्धा तास आधी म्हणजेच ३ वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णदार मैदानात उतरतील. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून आजचा सामना जो संघ जिंकेल तो मालिका आपल्या नावावर करेल. या निर्णायक सामन्यात कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी आणि दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

‘… त्या दिवशी मी क्रिकेट सोडून देईन’; निवृत्तीवर Rohit Sharma चे वक्तव्य व्हायरल

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

लॉर्ड्सची खेळपट्टी सामान्यतः गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजीसाठी तितकी फायदेशीर मानली जात नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. सामना जसजसा जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होण्याची शक्यता आहे आणि फलंदाजी करणे अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळे, नाणेफेक यात निर्णायक भूमिका बजावेल. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. विशेष म्हणजे, २०१७ पासून लॉर्ड्सवर एकाही एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाने यशस्वीपणे लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवलेला नाही. लॉर्ड्सवर आतापर्यंत ७१ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३५ वेळा, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३३ वेळा विजय मिळवला आहे. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २४० ते २५० धावांच्या दरम्यान राहिली आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण

या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चां सुरु झाली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील त्याच्या संथ खेळीनंतर, लॉर्ड्सवरील सामना हा भारतासाठी त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आजचा सामना खरतं रोहितचा शेवटचा सामना असणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्ष दुबे/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर/जोश टंग, साकिब महमूद, आदिल रशीद.

Lionel Messi रचणार इतिहास? अर्जेंटिना-स्पेन फायनलमध्ये मोडू ‘हे’ शकतो 5 मोठे विक्रम

Web Title: Ind vs eng 3rd odi lords pitch report playing 11 rohit sharma series decider

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.