जो रूट(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या लीड्स कसोटीत चार दिवसांचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावा ठेवल्या आहेत. चौथ्या दिवसांच्या खेळाच्या अखेरीस जॅक क्रॉली १२ धावांसह आणि बेन डकेट ९ धावांसह खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. त्यांना आता पहिली कसोटी जिंकण्यासाठी ३५० धावांची आवश्यकता आहे. त्याआधी दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ऋषभ पंत(११८) आणि केएल राहुल (१३७) यांनी दमदार शतके झळकावलीया आहेत. या सामन्या दरम्यान इंग्लंडचा फालदनांज जो रूटने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
इंग्लंडचा फलंदाज जो रूटने हेडिंग्ली कसोटीत एक इतिहास रचला आहे. यावेळी त्याने फलंदाजीद्वारे नाही तर क्षेत्ररक्षणाद्वारे हा विक्रम रचला आहे. जो रुटने माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. याशिवाय, तो आता इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
हेही वाचा : रिंकू सिंग आणि प्रिया सरोजचे लग्न कॅन्सल! या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली तारीख, कारण ऐकून व्हाल हैराण
जो रूटच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद..
भारतीय संघाविरुद्ध लीड्स कसोटीपूर्वी, इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल घेऊन विक्रम केला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने केएल राहुलचा झेल टिपला तर दुसऱ्या डावात त्याने शार्दुल ठाकूरचा झेल घेतला. या दोन झेलसह, जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २१० झेल घेतले आहेत.
जो रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये झेल पकडण्याच्या बाबतीत माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविडच्या बरोबरीत आला आहे. आतापर्यंत, राहुल द्रविड आणि जो रूट यांच्याकडे संयुक्तपणे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम जमा आहे. या यादीत श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धने तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने २०५ झेल घेतले आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि जॅक कॅलिस २००-२०० झेल घेऊन यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थान पटकावले आहे.
हेही वाचा : ENG vs IND : एकाच सामन्यात भारताचे चार शतकवीर, पाच सेंच्युरी! वाचा सर्वात्तम खेळी कोणाची?
हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात जो रूटला चांगला खेळ करता आला नाही. २८ धावा काढल्यानंतर तो जसप्रीत बुमराहचा शिकार ठरला होता. आता दुसऱ्या डावात इंग्लिश संघाला रूटकडून खूप अपेक्षा असणार आहे. पहिली कसोटी जिंकण्यासाठी संघाला ३५० धावांची आवश्यकता आहे तर भारताला १० विकेट्स मिळवण आवश्यक आहे.