फोटो सौजन्य – X
ऋषभ पंतच्या नावावर नवा रेकाॅर्ड : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, कालपासून इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच तिने भारताचे युवा खेळाडूंनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं. यामध्ये केएल राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी कहर केला. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने काही वर्ष विकेटकीपिंग केली, त्यानंतर मागील बरेच वर्षांपासून ऋषभ पंत हा विकेटकीपिंगची भूमिका साकारत आहे. त्याच्या विकेटकीपिंगने आणि फलंदाजी नेत्याने नेहमीच प्रभावित केले आहे. लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने आपल्या धमाकेदार फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले.
ENG vs IND : भारताच्या नव्या युगाचे केलं ‘शुभ’ आगमन, कर्णधार शुभमन गिलने शतक ठोकून रचला इतिहास
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पंतने आपल्या शैलीत इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाचा धुमाकूळ घातला. इंग्लंड संघाचा प्रत्येक गोलंदाज पंतसमोर पूर्णपणे असहाय्य दिसत होता. पंतने कर्णधार शुभमन गिलसह चौथ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली आहे. या डावात पंतने एक मोठा टप्पा गाठला आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे.
3⃣0⃣0⃣0⃣ runs in Test cricket and counting 🙌
Half-century for vice-captain Rishabh Pant 👏👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/CdPNDrrBGJ
— BCCI (@BCCI) June 20, 2025
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने बेन स्टोक्सला क्रिजवर येताच एका जबरदस्त चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. पंतने वेगवान शैलीत खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, पंत अजूनही क्रिजवर आहे, त्याने १०२ चेंडूत ६५ धावा केल्या आहेत. या डावात पंतने ६ चौकार आणि २ उत्तुंग षटकार मारले आहेत. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ऋषभ कसोटीत ३ हजार धावा पूर्ण करणारा सर्वात जलद आशियाई विकेटकीपर फलंदाज बनला आहे. पंतने केवळ ७६ व्या डावात हा टप्पा गाठला आहे.
🚨 RISHABH PANT BECOMES THE FASTEST ASIAN WK TO COMPLETE 3000 TEST RUNS 🚨 pic.twitter.com/d15AnEp1XI
— Johns. (@CricCrazyJohns) June 20, 2025
भारताचा संघ आज रिषभ पंत आणि शुभमन गिल हे दोघे दुसऱ्या दिनाची सुरुवात करणार आहेत. दोघेही कालपासुन चांगली कामगिरी करत आहेत. आज जर भारताच्या संघाने चांगली खेळी खेळली तर इंग्लडविरुद्ध मोठी आघाडी घेण्यात यश मिळेल.