फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच संघांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला कालपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताच्या दोन फलंदाजांनी पहिल्याच दिनी दोन शतक झळकावले आहेत. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल या दोघांनी कमालीची कामगिरी केली यशस्वी जयस्वाल यांनी 101 धावा केला तर शुभमन गिल हा अजूनही नाबाद खेळत आहे. कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला. इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावणारा तो फक्त पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी चार भारतीय कर्णधारांनी ही कामगिरी केली आहे.
इंग्लंडच्या भूमीवर शेवटचे शतक माजी कर्णधार विराट कोहलीने २०१८ मध्ये केले होते. याशिवाय त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. खरं तर, आतापर्यंत फक्त चार भारतीय कर्णधारांनी इंग्लंडमध्ये शतके झळकावली आहेत. इंग्लंडमध्ये शेवटचे शतक ७ वर्षांपूर्वी भारतीय कर्णधाराने केले होते. २०१८ मध्ये विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावले होते. २५ वर्षीय शुभमन गिलने हा दुष्काळ संपवला आहे.
नशीबाचा खेळ! ऐकमेकांना आपटले, गोंधळले पण आऊट झाले नाही, MPL 2025 मध्ये काहीतरी नवीनच…Video Viral
तो भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक करणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक करणारा गिल हा २३ वा खेळाडू आहे. हर्बी टेलर, अॅलिस्टर कुक आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यानंतर तो चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे.
HUNDRED from the Skipper! 💯
First match as Test Captain and Shubman Gill has scored a sublime century! 👏👏
His 6th Ton in Test cricket 🙌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/CVTE7wK2g0
— BCCI (@BCCI) June 20, 2025
एवढेच नाही तर कसोटी कर्णधारपदी शतक झळकावणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला. या यादीत विजय हजारे पहिल्या स्थानावर आहेत. सुनील गावस्कर दुसऱ्या स्थानावर आहेत. विराट कोहलीचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे.