ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत ३ सामने खेळून झाले आहेत. या मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या कसोटीमध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे.
लॉर्ड्सवेवर खेळवण्यात आलेल्या कसोटीदरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यानंतर ध्रुव जुरेल दोन्ही डावांमध्ये विकेटकीपिंग करताना दिसून आला होता. तथापि, ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने पहिल्या डावात अर्धशतक देखील झळकावले होते. परंतु दुसऱ्या डावात तो अधिक वेदनांनी भरलेला दिसून आला होता. ऋषभ पंतची सद्याची प्रकृती पाहता असे दिसते की तो पुढील सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. ऋषभ पंतच्या तब्बेतीबाबत अद्याप स्पष्ट झालेली नाही.
लॉर्ड्स कसोटीतील दुखापतीनंतर पंतच्या चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, शनिवारी जुरेल क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीपसोबत सराव करताना दिसून आला. ईएसपीएन क्रिकइन्फोने जुरेलचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर असे दिसते आहे की ज्युरेलला पुढील सामन्यात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ज्युरेलच्या विकेटकीपिंग प्रशिक्षणाकडे बघता पंतबद्दलच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
ज्युरेलने मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर तो भारताचा दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे. त्याचे तंत्र मजबूत असल्याचे मानले जाते. तो बचावात्मक आणि आक्रमक दोन्ही प्रकारे खेळण्याची क्षमता ठेवतो. ज्यामुळे त्याची फलंदाजी आत्मविश्वासपूर्ण असलेली दिसून येते.
Dhruv Jurel gets some keeping work in ahead of Manchester – will he be the designated (wk) with Pant as a pure bat? 🤔
Read more: https://t.co/ZnEDLd9b9X | #ENGvIND pic.twitter.com/BKWfWZ4VTf
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 19, 2025
त्याच वेळी, भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशाटेयांनी आशा व्यक्त केली आहे, की पंत वेळेत तंदुरुस्त होईल आणि पुन्हा विकेटकीपिंगची जबाबदारी देखील स्वीकारेल. गुरुवारी भारताच्या पहिल्या सराव सत्रानंतर मँचेस्टरमध्ये पत्रकारांशी बोलताना दोशाटे यांनी सांगितले की, पंत सामन्यापूर्वी फलंदाजी करेल, परंतु संघ व्यवस्थापन त्याच्या बोटाच्या दुखापतीबद्दल सावध असणार आहे.
रायन टेन डोशाटे म्हणाले आहेत की,”तो कसोटीपूर्वी मँचेस्टरमध्ये फलंदाजी करणार. मला, वाटत नाही की तुम्ही कोणत्याही किंमतीसाठी ऋषभला कसोटीतून बाहेर ठेवणार. तिसऱ्या कसोटीत त्याने खूप वेदना सहन करत फलंदाजी केली होती. आता त्याच्या बोटाचा त्रास कमी होईल. पण आम्ही हे देखील सुनिश्चित करणार आहोत कि, आम्हाला मध्यभागी यष्टीरक्षक बदलावा लागणार नाही.