जो रूट(फोटो-सोशल मीडिया)
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील 3 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली तर इंग्लंड ही मालिका खिशात घालेल. त्यामुळे या सामन्यात भारताला आपले सर्वोत्तम द्यावे लागणार आहे.
याबरोबर हा सामना इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटसाठी देखील अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात रूटला इतिहास रचण्याची संधी आहे. राहुल द्रविड, जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंगला मागे टाकून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : हार्दिक पंड्या मुलगा अगस्त्यसोबत झाला भक्तीत लीन; बाप-लेकाने गायले भजन; पहा व्हिडिओ
जो रूटला चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडसाठी १५६ कसोटी सामन्यांमध्ये ५०.८ च्या सरासरीने १३२५९ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता पाचव्या स्थानावर आहे. या यादीत राहुल द्रविड चौथ्या स्थानावर आहे( १६४ कसोटी सामन्यात १३२२८ धावा), तर जॅक कॅलिसने (१६६ कसोटी सामने १३२७९ धावा), जो रूट राहुल द्रविडपेक्षा फक्त २९ धावांनी मागे आहे, तर कॅलिसला मागे टाकायला फक्त ३० धावांची गरज आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर रिकी पॉन्टिंग विराजमान आहे. त्याने १६८ कसोटी सामन्यात १३३७८ धावा केल्या आहेत. जो रूट पॉन्टिंगपेक्षा ११९ धावांनी पिछाडीवर आहे.
या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. त्याने २०० सामन्यात ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा फटकावल्या आहेत. जर इंग्लंडचा फलंदाज राहुल द्रविड जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंगला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर आला आणि त्याने १२० धावा केल्या तर रूट आणि सचिन तेंडुलकरच्या धावांमधील फरक फक्त २५४२ धावांचे असणार आहे. सध्याचा फॉर्म बघता रूट स्वतः मँचेस्टर कसोटीत धाव काढून इतिहास रचू शकतो.
हेही वाचा : अखेर मोहम्मद शमी परतला! आयपीएलनंतर ‘या’ संघाकडून मैदानात दाखवणार फलंदाजांना तारे..
जो रूट भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी करत आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये २५३ धावा केल्या आहेत. रूटने यामध्ये एक शतक देखील झळकावले आहे. तसेच त्याच्या नावावर एक अर्धशतक देखील जमा आहे. रूट आता मँचेस्टर कसोटीतद देखील मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.