केएल राहुल आणि रवी शास्त्री(फोटो-सोशल मीडिया)
Ravi Shastri on KL Rahul : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील ३ सामने खळउन झाले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाली. यामध्ये भारताचा सलामीवीर केएल राहुलने तीन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. राहुलच्या कामगिरीचे सगळे कौतुक करत आहेत. अशातच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आशा व्यक्त केली आहे की राहुल पुढील तीन-चार वर्षे ही लय कायम ठेवणार आहे.
भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री यांनी राहुलबद्दल मोठे विधान केले आहे. म्हणाले की, “फ्रंट फूट तंत्र बदलल्यानंतर राहुलला चांगला फायदा झाला आहे. आशा आहे की तो अशीच कामगिरी करत राहील. राहुलने तीन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ३७५ धावा फटकावल्या आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत आणि जेमी स्मिथनंतर तो आतापर्यंत मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
आयसीसीच्या पुनरावलोकनादरम्यान शास्त्री यांनी राहुलबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, “वाटते की त्याने फ्रंट फूट तंत्रात थोडा बदल केला आहे. याशिवाय, बचाव करताना देखील त्याची भूमिका बदलली आहे. नवीन तंत्रामुळे त्याला बाद होण्याची किंवा एलबीडब्ल्यू आउट होण्याची शक्यता खूप कमी झाली आहे.” असे शास्त्री म्हणाले.
शास्त्री पुढे म्हणाले की, “इंग्लंडच्या परिस्थितीत स्विंग होणाऱ्या चेंडूंना तोंड देण्याची तंत्र राहुलने विकसित केले आहे. तो तंत्रात समृद्ध आहे. आतापर्यंत चेंडूमध्ये फारशी हालचाल झालेली नाही, परंतु जरी चेंडू हलला तरी त्याचा सामना करण्यासाठीचे तंत्र त्याच्याकडे आहे. जगात असा एक देखील नसेल जो म्हणेल की राहुलकडे प्रतिभा नाही. राग असा होता की इतका प्रतिभावान असूनही तो कामगिरी करू शकला नाही, परंतु या मालिकेत तो उत्तम लयीत दिसत आहे.”
हेही वाचा : अखेर मोहम्मद शमी परतला! आयपीएलनंतर ‘या’ संघाकडून मैदानात दाखवणार फलंदाजांना तारे..
रवी शास्त्री यांनी अशी आशा व्यक्त केली की “पुढील येणाऱ्या काही वर्षांत त्याची फलंदाजीची सरासरी ५० च्या आसपास राहणार आहे. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. जर तो आगामी तीन-चार वर्षे असाच खेळत राहिला तर तो अनेक शतके साकारेल. कारण, तो भारतात देखील बरेच क्रिकेट खेळत आहे. त्याची सरासरी सुमारे ५० असावी.” केएल राहुलने आतापर्यंत ६१ कसोटी सामन्यांमध्ये ३५.३ च्या सरासरीने ३६३२ धावा फाटकावल्या आहेत. यामध्ये १० शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहेत.