न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्सने विजय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ ODI Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला गेला. टॉस गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत केएल राहुलच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य दिले होते. डॅरिल मिशेलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने २८५ धावांचे लक्ष्य गाठून भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : KL Rahul ने केला भीम पराक्रम! ODI मध्ये 2025 नंतर अशी करणारा तो जगातील पहिला फलंदाज…
राजकोट येथे खेळलया गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. भारताने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर ७ गाडी गमावून २८४ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेव्हॉन कॉनवे १६ तर हेन्री निकोल्स १० धावा करून बाद झाले. तेव्हा संगहची धावसंख्या ४६ होती. त्यानंतर मैदानात विल यंग आणि डॅरिल मिशेल या जोडीने भारतीय गोलंदाजांना कोणतीच संधी न देता चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी १६२ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा विजय निश्चित केला.
विल यंग ९८ चेंडूत ८७ धावा करून कुलदीप यादवचा शिकार ठरला. यंगने त्याच्या खेळीत ७ चौकार लागावले. दरम्यान डॅरिल मिशेलने आपले शतक पूर्ण केले. त्याने ग्लेन फिलिप्सला साथीने घेत संघाला विजय मिळवून दिला. डॅरिल मिशेलने ११७ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर फिलिप्सही ३२ धावांवर नाबाद राहिला.परिणामी, न्यूझीलंड संघाने ४७.३ षटकात सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
हेही वाचा : DC vs UPW, WPL Live Score : मेग लॅनिंगने UP वॉरियर्सचा डाव सावरला; DC समोर 155 धावांचे लक्ष्य
भारताचा प्लेइंग ११ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
न्यूझीलंडचा प्लेइंग ११ : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स






