UP वॉरियर्सचे DC समोर 155 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
DC vs UPW, WPL Live Score : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत मेग लॅनिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर ८ गडी गमावत १५४ धावा केल्या आहेत. दिल्लीकडून मारिजाने कॅपने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : KL Rahul ने केला भीम पराक्रम! ODI मध्ये 2025 नंतर अशी करणारा तो जगातील पहिला फलंदाज…
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असून या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन यूपी वॉरियर्स प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यूपी वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली नाही. किरण नवगिरेच्या रूपात पहिला धक्का बसला. संगहचया शून्य धावा असताना नवगिरे भोपळाही न फोडता माघारी गेली. तिला मारिजाने कॅपने बाद केले. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग आणि फोबी लिचफिल्ड यांनी डाव सावरून ४७ धावांची भागीदारी केली. लिचफिल्ड २७ धावा करून बाद झाली. तिला स्नेह राणाने माघारी पाठवले.
त्यानंतर आलेली हरलीन देओल आणि मेग लॅनिंग यांनी डावाची सूत्रे हातात घेतले आणि ८५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग ३८ चेंडूत ५४ धावा करून बाद झाली. यामध्ये तिने ९ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर मात्र संघ ढासळत गेला. हरलीन देओल ४७ धावा करून रि़टायर्ड आउट झाली. त्यानंतर मांतर कोणत्याही फलंदाजाला टिकता आले नाही. श्वेता सेहरावत ११, क्लो ट्रायॉन १, सोफी एक्लेस्टोन ३, दीप्ती शर्मा २ धावा करून बाद झाले तर आशा शोभना १ धाव आणि शिखा पांडे २ धावांवर नाबाद राहिल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मारिजाने कॅप आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर नंदनी शर्मा, श्री चरणी आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), चिनेल हेन्री, मारिजाने कॅप, स्नेह राणा, निकी प्रसाद, मिन्नू मणी, नंदनी शर्मा, श्री चरणी
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, क्लो ट्रायॉन, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड






