सुनील गावस्कर(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील वडोदरा येथे खेळला गेलेला पहिला सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला तर राजकोट येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंड ७ विकेट्सने प्राप्त केला. या मुळे आता ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. दरम्यान, राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताला किती सहज पराभूत केले हे पाहून माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान संघाला त्यांच्या संघात प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळणार नाही. डॅरिल मिशेलच्या नाबाद १३१ धावांमुळे न्यूझीलंडने राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात २८५ धावांचे लक्ष्य गाठले आणि सात विकेटने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. मालिकेचा निर्णायक सामना इंदूरमध्ये खेळला जाईल.
न्यूझीलंड इतक्या सहज जिंकला हे पाहून मला आश्चर्य वाटले. कारण फलंदाजी सुरू करण्यापूर्वी सर्वांना वाटले होते की भारत संथ खेळपट्टीचा फायदा घेऊ शकेल. फक्त फिरकी गोलंदाजांनीच नाही तर त्यांच्या (न्यूझीलंडच्या) सर्व गोलंदाजांनी खेळपट्टीच्या संथ गतीचा चांगला वापर केला. भारत न्यूझीलंडला सुमारे २६० किंवा २७० धावांपर्यंत रोखू शकेल असे वाटत होते. मला वाटले की हा भारतासाठी सोपा विजय असेल. गावस्कर यांनी मिशेलचेही कौतुक केले, ज्याने विल यंग (८७) सोबत १६२ धावांची भागीदारी करून पाहुण्या संघाचा विजय निश्चित केला.
गावस्कर म्हणाले की, मालिका निर्णायक सामन्यात भारतावर दबाव असेल आणि यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूला आजमावण्याची संधी संघाकडे नव्हती, जर त्यांनी राजकोटमध्ये मालिका जिंकली असती तर त्याला इंदूरमध्ये संधी देता आली असती. जर त्यांनी (भारताने) हा सामना जिंकला असता तर त्यांना थोडे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळाले असते. कदाचित त्यांनी अशा खेळाडूंना संधी दिली असती जे अद्याप खेळलेले नाहीत. हे सर्व शक्य झाले असते, परंतु आता ते कोणताही धोका पत्करू शकत नाहीत.
न्यूझीलंडचा माजी खेळाडू सायमन डौल यांनी मिशेलच्या खेळीचे आणि कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या भारतीय फिरकी जोडीचा सामना करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. कुलदीपने त्याच्या १० षटकांत ८२ धावा दिल्या आणि फक्त एक बळी घेतला, तर जडेजाने आठ घटकांत ४४ धावा देऊन एकही बळी न घेता फलंदाजी केली. डौल म्हणाले, मिशेलचे भारताविरुद्ध खूप चांगले आकडे आहेत. आपण वारंवार पाहतो, रिव्हर्स स्वीप, त्याच्या पायांचा वापर, तो कुलदीपविरुद्ध खूप जलद खेळला आणि पहिल्याच षटकात त्याच्यावर दबाव आणला. त्या क्षणापासून कुलदीपने त्याची लय गमावली, जी सहसा घडत






