India makes a winning start to the U19 World Cup 2026 : आज आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा पहिला सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. टॉस गमावणाऱ्या अमेरिका संघाने सर्वबाद १०७ धावा केल्या होत्या. सामान्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला ९६ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकात ४ विकेट्स गमावून पूर्ण केले आणि दमदार विजय मिळवला.
हेही वाचा : अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर
अभिज्ञान कुंडूने शानदार खेळीने भारताचा विजय सोपं केला. तो जेव्हा क्रीजवर आला तेव्हा भारताच्या २५ धावांत ३ विकेट गेल्या होत्या. वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी आणि आयुष म्हात्रे आधीच माघारी गेले होते. त्यानंतर कुंडूने विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहानसोबत भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून अभिज्ञान कुंडूने सर्वाधिक ४२ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याने षटकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकूणच भारताची सुरुवात विजयाने झाली.
अभिज्ञान कुंडूच्या भारताचा वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने विजयाचा पाया रचला होता. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने अमेरिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने ७ षटकांत फक्त १६ धावा देत अमेरिकेच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले. त्याच्या या कामगिरीमुळे अमेकरिका ३५.२ षटकात १०७ धावांवर गारद झाला. इथेच भारताचा विजय निश्चित मानला जाऊ लागला होता. १९ वर्षांखालील विश्वचषकात हेनिल पटेलने घेतलेला पाच बळी ही खास कामगिरी ठरली. कारण आठ वर्षांनंतर आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजाने जी किमया साधली आहे.
हेही वाचा : IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर
भारत अंडर U19 प्लेइंग 11: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश पनगालिया, आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, खिलन पटेल
युनायटेड स्टेट्स U19 प्लेइंग 11: साहिल गर्ग, अमरिंदर गिल, अर्जुन महेश (विकेटकीपर), उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), ऋत्विक अप्पीडी, अदनीत झांब, अमोघ अरेपल्ली, नितीश सुदिनी, सबरीश प्रसाद, आदित कप्पा, ऋषभ शिं






